Sunetra Pawar : शरद पवार, अजितदादांच्या समर्थकांसाठी 'गुड न्यूज'; पण इलेक्शननंतर...

Baramati Lok Sabha Constituency : शरद पवारांनी केलेल्या मूळ पवार आणि बाहेरचे पवार या विधानाने बारामती मतदारसंघ चांगलाच ढवळून निघाला आहे. यावरून अजित पवारांसह महायुतीचे नेत्यांनी पवारांना लक्ष्य केले.
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकमेकांविरोधात उतरले आहेत. प्रचाराच्या काळात त्यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पवार कुटुंबीयात फूट पडल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर भूमिका स्पष्ट करीत सुनेत्रा पवारांनी कुटुंब एकत्र येणार असल्याचे संकेत दिले. 'निवडणूक संपल्यानंतर आम्ही पवार कुटुंब येऊ शकतो, असे सुनेत्रा पवारांनी मीडियापुढे स्पष्ट केले. परिणामी निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी इलेक्शननंतर पवार समर्थकांसाठी 'गुड न्यूज' राहणार हे नक्की!

शरद पवारांविरोधात भूमिका घेतल्या अजित पवारांसोबत फक्त त्यांचेच कुटुंब राहिले. पवार कुटुंबातील इतर मंडळींनी शरद पवारांची Sharad Pawar साथ दिली. आता लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. त्यातच पवारांनी केलेल्या मूळ पवार आणि बाहेरचे पवार या विधानाने मतदारसंघ ढवळून निघाला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच सुनेत्रा पवारांनी निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, असे वक्तव्य केले आहे.

सुनेत्रा पवार Sunetra Pawar मंगळवारी (ता. १६) खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. तेथे त्यांनी भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांची भेट घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात फिरताना नागरिकांचा प्रतिसादातून चांगले मताधिक्य मिळणार आहे. भोर एमआयडीसी आणि पुरंदर विमानतळाचा प्रश्न मतदारसंघात महत्त्वाचा असून, मी हे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar News : याला म्हणतात 'शरद पवार' पॅटर्न! बारामतीत अजितदादांच्या शिलेदारावरच गळ?

दादांनी विकासासाठी मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची भूमिका घेतली असून, त्यानुसारच माझी वाटचाल सुरू आहे. पवार कुटुंबामध्ये आपल्याला एकटे पाडण्यात येत असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते. त्यावर त्या म्हणाल्या, जनतेमधून माझ्या उमेदवारीची मागणी होत होती. त्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे बारामतीकर हेच माझे कुटुंब असून, ते माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही एकटे नसल्याचा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे पवार कुटुंबात फूट पडल्याचे बोलले जात आहे. मने दुखावली असतील, यावर सुनेत्रा पवार म्हणाल्या, निवडणुका या तेवढ्यापुरत्याच असतात. आपापला प्रचार करताना आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी होणे अपेक्षितच आहे. यामुळे मला वाटते निवडणुकीनंतर नात्यांमध्ये नक्कीच सुधारणा होतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलून दाखवला. दरम्यान, आमचे राजकीय मतभेद असून कुटुंबात कुठल्याही प्रकारचा वाद नसल्याचे खासदार सुप्रिया सुळेंनी Supriya Sule वारंवार सांगितले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Ajit Pawar, Sunetra Pawar, Sharad Pawar
Sharad Pawar News : लोकसभेच्या प्रचारासाठी शरद पवारांचा 'मेगा प्लॅन'; 22 दिवसांत घेणार तब्बल 50 सभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com