Bajrang Sonawane Pune Press News : बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती झाल्यानंतर देखील फिर्यादीची बाजू मांडण्यासाठी आपण आणखीन एक वकील देणार असल्याचं बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना बजरंग सोनवणे(Bajrang Sonawane) म्हणाले, सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रासमोर गुन्हेगारीचा चेहरा आला आहे. यामध्ये जो एक नंबर चा आरोपी आहे. त्याला गुंडांचा राजा किंवा गुंडांचा प्रमुख म्हणता येईल. मात्र या मास्टरमाईंडच्या खाली 11 आणि त्याच्याही खाली 11 माणसे गुन्हेगारी कारवायांत सक्रीय आहेत. या सगळ्यांची जिल्ह्यात सुमारे 100 जणांची टोळी आहे. या टोळीला राजकीय वरदहस्त आहे.
या प्रकरणात ज्याप्रमाणे CID आली आहे. तशीच ED सुद्धा आली पाहिजे. यातून अनेक बेकायदेशीरबाबी समोर येतील. त्यामुळे कोर्टात दोषारोपपत्र दाखल झालं म्हणून हे प्रकरण इथेच थांबत नाही. अजून शेवटच्या टोकापर्यंत जायला पाहिजे.
या प्रकरणात अटक करणार आलेल्या आरोपींशिवाय वाल्मिक कराड(Walmik Karad) याला मदत करणारे महाजन आणि पाटील या दोन पोलिस अधिकाऱ्यांना सहआरोपी केले पाहिजे. तसेच आरोपींना मदत करणाऱ्या इतरांना आणि फरार आरोपींना देखील अटक झाली पाहिजे. या सगळ्या गुन्हेगारी कारवायांसाठी राजकीय वरदहस्त कुणाचा हे सगळ्यांना माहिती आहे. मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही. पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का?
ज्या व्यक्तीने नागपूर अधिवेशन सुरू असताना बाहेरून बाईट दिला होता आणि सांगितले होते की वाल्मिक कराड माझा माणूस आहे. त्याच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. योग्य तपास झाला तर त्या माणसापर्यंत पोहोचता येईल, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर ती निशाणा साधला.
खासदार सोनवणे पुढे म्हणाले, पोलिस यंत्रणेच आज कौतुक केलं पाहिजे. परंतु पुढे गुन्हे सिद्ध कसे होतील याची खबरदारी घेतली पाहिजे. त्यामुळे सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती सरकारी वकील म्हणून केली असली, तरी यांच्याबरोबर फिर्यादीच्या वतीने सतीश माने शिंदे यांच्या मार्फतही खटला चालवणार आहोत. त्यांनी होकार दिला आहे त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे देखील सोनवणे यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.