
Delhi politics latest : दिल्ली सरकारमधील PWD मंत्री प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, केजरीवालांच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी होईल आणि त्यांना वाटतं की अरविंद केजरीवाल या जन्मात तिहारमधून बाहेर येणार नाहीत. जाणून घेऊय़ात प्रवेश वर्मा यांनी आणखी काय म्हटलं आहे?
प्रवेश वर्मा(Pravesh Verma) यांनी म्हटले की, दिल्ली पूर्ण राज्य नाही, पण महत्त्वपूर्ण राज्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही दिल्लीचा विकास करू आणि संपूर्ण राज्य बनवू. ते लोक दिल्लीला लंडन बनवण्याच्या बाता करत होते, पण बनवले काय दारूचे अड्डे. शाळेच्या बाहेर, मंदिरांच्या बाहेर दारूचे ठेके उघडले. एवढंच काय तर शीश महलमध्येही बार बनवला. अलीशना कार्यालय बनवलं तिथे कोणालाही येण्याजाण्याची परवानगी नव्हती.
याचबरोबर प्रवेश वर्मा यांनी म्हटले की, अरविंद केजरीवालांना(Arvind Kejriwal) आपल्या आई-वडिलांना देखील सोडलं नाही. त्यांचे आई-वडील चालू शकतात पण तरीही त्यांना व्हीलचेअरवर मतांसाठी बसवलं. निवडणुकीच्या दोन महिन्यात केजरीवालांनी दिल्लीला जातीपातीत विभागलं.
तसेच मी बंगाली कॅम्पमध्ये गेलो होतो. तिथे एक विधवा भगिनी भेटली. जिचे नाव मोनी दास आहे. तिने सांगितले की तिच्या दोन्ही मुलांचा यांच्या मद्य धोरणामुळे मृत्यू झाला, अशी अनेक उदाहरणं आहेत.
भागांची नावं बदलण्यात आल्याबाबत प्रवेश वर्मा यांनी म्हटले की, नाव बदलणं केवळ काम नाही. परंतु नाव बदलून आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे. आक्रमणकर्त्यांनी जी नावे बदलली होती, ती नावं आम्ही नक्कीच बदलू. केजरीवालांच्या सर्वच घोटाळ्यांची चौकशी होईल. मला वाटतं की अरविंद केजरीवाल या जन्मात तरी तिहारमधून बाहेर येणार नाहीत. केजरीवाल सरकारच्या काळात खूप रेशनकार्ड बनले आहेत. जर एखाद्या बांगलादेशीचं रेशनकार्ड बनवलं गेले असेल तर त्याबाबत चौकशी होईल आणि कारवाई होईल.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.