Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Sarkarnama Analysis : कोथरूड आणि वडगावशेरी ठरविणार पुण्याचा खासदार !

Pune Loksabha News : मतदार कोणाच्या मागे उभे राहिले आहेत. याचा फैसला 4 जून ला होणार आहे. या मतदारांनी कोणाच्या बाजूने आपला कौल दिला आणि हे कोणाला फायद्याचे ठरणार आहेत, हे निकालातून दिसणार आहे.

Chaitanya Machale

Pune Loksabha News : पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत 3.7 टक्के वाढ झाली आहे. निवडणुकीत वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदारसंघांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, त्यावर पुण्याचा नवा खासदार ठरणार आहे.

पुणे लोकसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. पुणे शहरात 53.54 टक्के मतदान झाले आहे. लोकसभेच्या 2019 मध्ये पुणे लोकसभेसाठी 49.84 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या वर्षी मतदानात 68 हजार 442 ने वाढ झाली आहे. हे वाढलेले मतदार कोणाच्या मागे उभे राहिले आहेत. याचा फैसला 4 जून ला होणार आहे. या मतदारांनी कोणाच्या बाजूने आपला कौल दिला आणि हे कोणाला फायद्याचे ठरणार आहेत, हे निकालातून दिसणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये 10 लाख 35 हजार 236 मतदारांनी मतदान केले होते. या वेळेस 11 लाख 03 हजार 678 मतदारांनी मतदान केले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा 67 हजार मतदारांची वाढ झाली आहे. भाजपला (BJP) गेल्या दोन निवडणुकींमध्ये या मतदारसंघातून तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न भाजप च्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी निवडणूक लढविली.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभा घेतल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची देखरेख, सक्षम प्रचार यंत्रणा यामुळे भाजपला पुण्यातील निवडणूक सोपी वाटत होती. मात्र प्रत्यक्षात मतदानापूर्वी शेवटच्या टप्प्यात रवींद्र धंगेकर यांनी चांगले आव्हान निर्माण केले. धंगेकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, यांच्यासह आम आदमी पार्टी, समाजावादी संघटनांची प्रचार केला. काँग्रेस हायकमांडने विदर्भातील आमदार पुण्यात पाठविले होते. त्यामुळे प्रचाराचे मोठे नियोजन झाले.

वडगाव शेरीमध्ये (Wadgaon Sheri) सर्वाधिक म्हणजे चार लाख 67 हजार 669 मतदार होते. लोकसभेच्या निकालात येथील मताधिक्य निर्णायक ठरणार असल्याने भाजप आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) या मतदार संघात लक्ष केंद्रित केले होते. कोथरूड विधानसभा मतदारसंघात मतदारसंख्या चार लाख 14 हजार 755 असून दोन लाख 17 हजार 455 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील मतदार ज्या उमेदवाराच्या बाजूने कौल देतील तोच पुणे शहराचा खासदार होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT