Dhangekar Vs Mohol: पर्वती धंगेकरांना साथ देणार की घात करणार?

Pune Lok Sabha Constituency 2024:गेल्या निवडणुकीत या ठिकाणी ५३.०७ टक्के मतदान झाले होते.गेल्या वेळेपेक्षा यंदा मतदान करणाऱ्यांची संख्या ७ हजार ७३९ ने वाढली आहे. वस्त्या झोपडपट्ट्यांचे मतदान मोहोळ यांना तारणार की मारक ठरणार...
Dhangekar Vs Mohol news
Dhangekar Vs Mohol newsSarkarnama

Pune News : एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पर्वती विधानसभा मतदासंघावर भाजपने आपली पकड मजबूत केली आहे. मात्र यंदा पर्वतीमधून काँग्रेसला मताधिक्य मिळविण्यासाठी आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी नेटाने प्रयत्न केले आहेत. त्यासाठी त्यांनी विशेष करून वस्तीभागावर लक्ष केंद्रित केले.

या भागात व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचा व्यवसाय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच कसबा मतदारसंघात आहे. त्यांच्याशीही रवींद्र धंगेकर यांनी संपर्क वाढविला आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनीही प्रचाराची व्याप्ती घटक पक्षांच्या मदतीने सर्वदूर वाढविली. त्यामुळेच महायुतीच्या या मतदारसंघात अपेक्षा वाढल्या आहेत, तर झोपडपट्टी आणि वस्ती भागाच्या जोरावर महाविकास आघाडीला येथे मताधिक्याचा विश्वास आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha Constituency 2024) निकालात कोथरूड आणि वडगाव शेरी बरोबरच पर्वती विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या मतदारसंघाकडून भाजप महायुतीला मताधिक्याच्या अपेक्षा आहेत, तर येथे मुसंडी मारू, असा विश्वास महाविकास आघाडीला आहे.

Dhangekar Vs Mohol news
Pm Modi Kalyan Sabha: मोदींच्या सभेपूर्वी रंगले 'मानापमान'; सन्मान नाही, मग पद कशाला? ; जिल्हाप्रमुखाने घेतला मोठा निर्णय

पर्वती विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपला चांगले मताधिक्य या ठिकाणी मिळाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पर्वती मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना ६७ हजार इतकी मताधिक्य मिळाले होते. तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार असलेल्या माधुरी मिसाळ यांना 37000 चे मताधिक्य मतदार संघातून मिळाले होते.

त्यामुळे या निवडणुकीत देखील मुरलीधर मोहोळ यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास महायुतीला आहे. यंदाच्या निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून ५५.४७ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत या ठिकाणी ५३.०७ टक्के मतदान झाले होते. गेल्या वेळेपेक्षा यंदा मतदान करणाऱ्यांची संख्या ७ हजार ७३९ ने वाढली आहे.

या मतदारसंघात एकूण ३ लाख ४१ हजार ५५ मतदार असून, यंदा १ लाख ८९ हजार १८४ मतदान झाले. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांतील लोकसंख्येचे प्रमाण सुमारे ४५ टक्के आहे, तर वस्ती भाग आणि गृहरचना संस्था एकूण ५५ टक्के आहेत. या मतदारसंघातून महापालिकेत सुमारे २५ नगरसेवक जातात. मागील निवडणुकीमध्ये त्यामधील 20 नगरसेवक हे भाजपचे होते.

मतदारसंघातील तळजाई, पानमळा, जनता वसाहत, दांडेकर पूल, दत्तवाडी, सिंहगड रस्त्यावरील महादेवनगर, आंबेडकरनगर, प्रेमनगर, गुलटेकडीतील इंदिरा वसाहत या भागात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी व्होट बॅंक असून काही प्रमाणात भाजप-शिवसेनेचाही त्यात वाटा आहे. गृहरचना सोसायट्यांच्या तुलनेत मतदानासाठी वस्ती आणि झोपडपट्टी भागातून उत्साह असल्याचे दिसून आले.

साने गुरुजीनगर येथील महापालिका वसाहत, बिबवेवाडी गावठाण, शिवदर्शन, पर्वती दर्शन, महर्षीनगर, लक्ष्मीनगर या भागातही मतदारांची संख्या मोठी आहे. या ठिकाणीं देखिल मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या परिसरात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना तसेच रिपब्लिकन पक्ष यांचे चांगले पॉकेट आहे, तर गृहरचना संस्थांचीही मोठी संख्या असून, त्यात जैन, माहेश्वरी, ब्राह्मण, मराठा आदी समाजांचे प्राबल्य आहे. त्यात भाजपला मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे हा भाग नेमका कोणता तारक ठरणार आणि मारक ठरणार हे चार जूनला स्पष्ट होईल.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com