पुणे : सत्ताधाऱ्यांकडून विकास केल्याचा कितीही दावा करण्यात येत असला तरी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-पंचवटी या प्रभागात पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम आहे.आजही बालेवाडी भागात टँकरने पाणी-पुरवठा करावा लागत आहे.बालेवाडी टँकरमुक्त दाखवा आणि पाच लाख रूपये मिळवा,असे आव्हानच डॉ. सागर बालवडकर (Sagar Balwadkar) यांनी दिले.त्यावर पाण्यासाठी काढण्यात आलेल्या हंडा मोर्चाला एकही माणूस आला नाही, असा दावा नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी केला.
‘सरकारनामा’ने आयोजित केलेल्या ‘सरकारनामा आपल्या वॉर्डात’ या उपक्रमात विद्यमान नगरसेवक तसेच सर्वपक्षीय इच्छुक व पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अमोल बालवडकर यावेळी उपस्थित होते. या भागातील पहिले नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राहूल कोकाटे,गणेश कळमकर, राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष नितीन कळमकर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश बालवडकर,आरपीआयचे संतोष गायकवाड याशिवाय मयूर भांडे, अनिकेत मुरकुटे, समीर उत्तुरकर, विशाल विधाते, किर्तीकुमार काळे, प्रदीप हुमे, रौनक गोटे, लक्ष्मण पाडाळे यांच्यासह सर्वपक्षीय इच्छुक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवल्याचा दावा केला.त्या म्हणाल्या, ‘‘ या भागात पाण्याचा प्रश्न होता. महिलांच्या दृष्टीने ही बाब महत्वाची होती.चोवीस तास पाण्याची योजना या पाच वर्षात आम्ही सुरू केली. त्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम सुरू आहे.’’ आम्ही पाच वर्षात केलेले काम जनतेच्या पसंतीस उतरणार आहे.विकासाची मोठी कामे या काळात झाली आहेत, असा दावा नगरसेविका ज्योती कळमकर यांनी केला.त्या म्हणाल्या,‘‘ पाण्यापासून रस्त्यांच्या कामापर्यंत गेल्या पाच वर्षात झालेला विकास आणि देशाच्या पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली प्रतिमा यामुळे आम्ही पुन्हा निवडून येण्यास कसलीच अडचण नाही. ’’
पाच वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून विकास केल्याचा दावा नगरसेवक करत आहेत. यांनी स्वत:च्या निधीतून कोणती कामे केली हे सांगावे, असे आव्हान कोथरूड राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष नितीन कळमकर यांनी केले. या भागातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या पाच वर्षात सर्वच नगरसेवकांनी केल्याचा दावा राहूल कोकाटे यांनी केला.आमच्या सर्व नगरसेवकांनी मिळून प्रभागाच्या विकासात मोलाची भर टाकल्याचा दावा गणेश कळमकर यांनी केला.
महापालिकेच्या योजनेतून देण्यात आलेल्या सायकली कुठे गेल्या असा प्रश्न मनसेचे अमित राऊत यांनी केला.ज्यूट बॅग आणि सायकलींवर महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्च केले. मात्र,आता त्या सायकलीही गायब झाल्याचा आरोप राऊत यांनी केला.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.