Satish Wagh Sarkarnama
पुणे

Satish Wagh Murder Case: आमदार टिळेकरांचे मामा अपहरण अन् हत्या प्रकरण; पुणे पोलिसांनी दिली मोठी अपडेट

MLA Yogesh Tilekar Mama Murder Case : पुण्यापासून सुमारे 34 किलोमीटरवर असलेल्या उरुळी कांचनच्या पुढे शिंदवणे घाटात त्यांचा हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Deepak Kulkarni

Pune News : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा व हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचे सोमवारी (ता.9) सकाळी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर उरुळी कांचनच्या पुढे असलेल्या शिंदवणे घाटात वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. आता या हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,सोमवारी सकाळच्या सुमारास वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले असताना चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यांनी जबरदस्तीने सतीश वाघ यांना गाडीत बसवून ते सोलापूरच्या दिशेने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले होते.

या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तपासाची वेगाने सूत्रे फिरवत जवळपास 10 ते 12 पथकं वाघ यांच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. मात्र,अखेर अपहरण करण्यात आलेल्या वाघ यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आठवडाभरात खुनाच्या 6 घटना पुण्यामध्ये घडल्या आहेत.

पुण्यापासून सुमारे 34 किलोमीटरवर असलेल्या उरुळी कांचनच्या पुढे शिंदवणे घाटात त्यांचा हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. मांजरी ते यवत या प्रवासादरम्यानच वाघ यांचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.

सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना उघडकीस आल्यानंत पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 12 टीमच्या मदतीने वाघ यांचा शोधाशोध सुरू केला होता. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे स्वत:हडपसरमध्ये उपस्थित राहून तपासाचे मॉनिटरिंग करत होते.

सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिसांना उरळी कांचनजवळील शिंदवणे घाट परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याचा खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाली असून ती सकाळीच करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास वाघ हे सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले असताना चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यांनी जबरदस्तीने सतीश वाघ यांना गाडीत बसवून पोबारा केला. ही गाडी सोलापूरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT