Satyajeet Tambe, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Satyajeet Tambe : बघा काय आली वेळ; मोदींच्या फोटोला काळे फासणाऱ्या तांबेच्या विजयासाठी आता भाजप झटणार !

Maharashtra Politics: सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा....

सरकारनामा ब्यूरो

Satyajeet Tambe & Devendra Fadnavis News : काँग्रेस व भाजपकडून उमेदवारांच्या घोषणेवरुन अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक राहिलेल्या नाशिक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स गुरुवारी संपला. काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेल्या डाँ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली अन् सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तांबेंच्या या खेळीमागं भाजप असल्याची जोरदार चर्चा आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपण ही निवडणूक जरी अपक्ष म्हणून लढत असलो तरी मी काँग्रेसचाच उमेदवार आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपसह, काँग्रेस,राष्ट्रवादी, ठाकरे व शिंदे गट यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्या त्या पक्षांच्या भेटी घेणार असल्याचंही जाहीर केलं आहे.

याचवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र, आम्ही उमेदवारी ही सुधीर तांबेंना दिली होती. मात्र,एेनवेळी तांबे यांनी माघार घेत सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाची फसवेगिरी केली आहे. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे उमेदवार नाही. आणि तांबेंवर काँग्रेस हायकमांडकडून जो आदेश देण्यात येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी भूमिकाही स्पष्ट केली आहे.

मात्र, नाशिक पदवीधरसाठी भाजपनं देखील आपला अधिकृत उमेदवार दिलेला नाही. तसेच तांबेंनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याबाबत मोठं विधान केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबे यांना असं किती दिवस बाहेर ठेवणार? चांगल्या माणसांवर आमचा डोळा आहे असं म्हंटलं होतं. त्यावरून नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, याचदरम्यान सत्यजित तांबे यांचा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्ला महागाई, बेरोजगारी विरोधातील आंदोलनातला फोटो सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत सत्यजित तांबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाच त्यांच्या पोस्टरवरील फोटोलो काळं फासताना दिसत आहे. हा फोटो तुषार खरे यांच्या टि्वटरवरुन शेअर करण्यात आला आहे. आणि यात देवेंद्रजी सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार ना? असा सवाल उपस्थित केला आहे.या फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काँग्रेस पक्ष तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करणार

डाॅ. सुधीर तांबे यांनी एेनवेळी निव़डणुकीतून माघार घेत मुलाला अपक्ष अर्ज भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आपण या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचं सांगितलं आहे. हा मोठा दगाफटका तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेससोबत केला आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कुणाचाही अर्ज दाखल केला नाही. इकडे सत्यजित तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेलं होतं.त्यामुळे हा धोका पक्ष विसरणार नाही, आता हायकमांड यावर निर्णय घेतली आणि पुढची कारवाई केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT