Pune News : पुण्याचं नाव बदला, मिटकरींची मागणी, तर आनंद दवेंनी घेतला आक्षेप!

Pune News : राजमाता जिजामातांबद्दल आदर पण, पुण्याचं नामांतर करू नये.
Pune News Amol Mitkari Anand Dave
Pune News Amol Mitkari Anand DaveSarkarnama

Pune News : औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांच्या नामांतराच्या मागणीवरून आता पुणे जिल्हा नामांतराचा मुद्दा आता उपस्थित होत आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेने यापूर्वी पुण्याच्या नाव बदलण्याची मागणी केली होती. आता राष्ट्रवादीचे विधानपरिषेदेवरील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याच्या नामांतराची मागणी केली आहे. यासंदर्भात ट्वीट केले आहे. त्यामुळे पुण्याचं नामांतर हा मुद्द्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे, "पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार." अशा आशयाचं ट्वीट मिटकरींनी केले आहे.

Pune News Amol Mitkari Anand Dave
Pune News : हिंदूराष्ट्र सेनेच्या नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेप : ॲड. निकमांचा युक्तिवाद कोर्टाने केला मान्य!

यावर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्या जिल्ह्याचं नावात बदल करण्याची काही एक गरज नाही, असे हिंदू महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी म्हटलं आहे. "पुण्याच्या नामांतराची काही एक गरज नाही. जिजाऊंचं भव्य दिव्य स्मारक उभारा आणि ते लाल महाल येथे उभारण्यात यावं, असे ते म्हणाले. याआधीची पुणे जिल्ह्याचे नाव 'जिजाऊ नगर' करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.

Pune News Amol Mitkari Anand Dave
Sunil Kedar मोठी बातमी : काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

दवे पुढे म्हणाले, राजमाता जिजाऊ या आपणा सर्वांना वंदनीय आहेत. पुण्याचं आणि राजमातांचं नाते सुद्धा आहे. पण पुणे जिल्ह्याला हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे, ते आता बदलण्याची आवश्यकता नाही. स्वतः शिवभक्त शिवछत्रपतींनी सुद्धा ते नाव बदलले नाही, असं आनंद दवे यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com