Pune News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची पुण्याच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण उलटतपासणी झाली. यावेळी सात्यकी सावरकर यांनी सावरकरांच्या दया याचिका, गोवंश विचार आणि सैन्य भरती यांसारख्या या विषयांवर भूमिका मांडली.
राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सात्यकी सावरकर म्हणाले, "अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना सावरकरांनी पाच वेळा ब्रिटीश सरकारला दया याचिका पाठवल्या होत्या, हे सत्य आहे. मात्र, त्या काळी सावरकरांप्रमाणेच इतर अनेक राजकीय कैद्यांनीही अशा कायदेशीर याचिकांचा आधार घेतला होता."
द्वि-राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर सावरकरांचा बचाव करताना ते म्हणाले की, ही संकल्पना सावरकरांनी मांडलेली नाही. "काही इतिहासकार तसा आरोप करत असले तरी, मूळ संकल्पना सर सय्यद अहमद खान यांची होती. सावरकरांनी केवळ तत्कालीन परिस्थितीतील वस्तुस्थितीवर भाष्य केले होते," असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांचा संदर्भ देताना सात्यकी यांनी न्यायालयात सांगितले की, "सावरकरांनी कधीही गाईला 'देव' मानले नाही. त्यांच्या मते गाय हा एक 'उपयुक्त पशू' होता. हा संदर्भ सावरकरांच्याच साहित्यातून येतो." कोणतीही मागणी केली नसल्याचा देखील खुलासा त्यांनी यावेळी केला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी भारतीयांना ब्रिटीश सैन्यात भरती होण्याचे जे आवाहन केले होते, त्याबद्दल बोलताना सात्यकी म्हणाले, सावरकरांवर हा आरोप नसून आक्षेप आहे. तरुणांनी सैन्यात भरती व्हावे ही सावरकरांची रणनीती होती. भारतीयांना लष्करी प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रांचा अनुभव मिळावा, जेणेकरून स्वतंत्र भारताकडे स्वतःचे सक्षम सैन्य असेल, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या याच भूमिकेमुळे १९४७ मध्ये पाकिस्तानच्या आक्रमणावेळी भारताकडे प्रशिक्षित सैन्य सज्ज होते."
भगतसिंग आणि इतर क्रांतिकारकांशी सावरकरांच्या होत असलेल्या तुलनेवर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. "कोणत्या थोर पुरुषाचे किती उदात्तीकरण करायचे किंवा संसदेत कोणाचे तैलचित्र लावायचे, हा सर्वस्व भारत सरकारचा अधिकार आहे.
सावरकरांना 'भारतरत्न' देण्याच्या मागणीवर बोलताना त्यांनी एकाच कुटुंबातील जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी या तीन सदस्यांना पुरस्कार दिले असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र सावरकरांच्या बाबतीत असा निर्णय घेण्याचे काम सरकारचे आहे." आपण स्वतःहून तशी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.