Rahul Gandhi News: 'स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी सावरकरांनाच का? राहुल गांधींच्या वकिलांचा न्यायालयात थेट सवाल!

Rahul Gandhi Remark on Savarkar Pune Court Hearing news: विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. याबाबतच्या खटल्यावर पुणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Pune Court News
Pune Court NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: "अंदमानच्या कारागृहात विनायक सावरकर यांच्या बरोबर जवळपास 568 इतर क्रांतिवीरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, हालअपेष्टा सहन केल्या. त्यामध्ये अनेकांनी प्राणही गमावले. मात्र हे सर्व क्रांतिकारक माझ्यासाठी समान असून त्यांच्या त्यागाबद्दल मला अपार आदर आहे," अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मांडली.

विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी सध्या पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. या दरम्यान सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी सुरु आहे.

Pune Court News
Sahar Sheikh News: 'कैसे हराया..' फेम MIM नगरसेविकेचे पद जाणार; तहसीलदारांकडून मोठी कारवाई

बचाव पक्षाचे म्हणजेच राहुल गांधी यांचे वकील ,ॲड. मिलिंद पवार यांनी, “अंदमानमध्ये शिक्षा भोगताना मृत्यू झालेल्या सर्व क्रांतिकारकांना ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणता येईल का?” असा थेट प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना सात्यकी सावरकर म्हणाले, "सशस्त्र आणि निशस्त्र अशा दोन्ही प्रकारचे क्रांतिकारक होते, मात्र उपाधी या जनतेकडून दिल्या जातात.महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी जनतेने दिली, पण प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाला ‘महात्मा’ म्हटले जात नाही. त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेतील सर्व सैनिकांना ‘नेताजी’ म्हटले जात नाही. ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी देखील जनतेने सावरकरांना दिली असून, त्यामुळे इतर क्रांतिकारकांचे योगदान कमी होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

“इतर क्रांतिकारकांना ‘स्वातंत्र्यवीर’ न म्हणणे हे समानतेच्या विरोधात आहे का?” या उपप्रश्नावर त्यांनी, “माझ्या दृष्टीने सर्वच क्रांतिकारक समान आहेत,” असे सांगत कोणालाही महात्मा, स्वातंत्र्यवीर, लोकमान्य किंवा क्रांतिवीर म्हणण्यास माझा आक्षेप नसल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे. न्यायालयातील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Pune Court News
Santosh Bangar News: मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, फोनही उचलत नाहीत; त्यांना घरी बसवा! शिंदेंसमोरच बांगर यांची डरकाळी..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com