savitribai phule pune university Sarkarnama
पुणे

Pune University Controversy : विद्यापीठात हॉस्टेलच्या भिंतीवर PM मोदींबाबत लिहिला आक्षेपार्ह मजकूर; भाजप आक्रमक

Savitribai Phule Pune University Controversy : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. यावरून वादाला तोंड फुटलं आहे.

Sachin Fulpagare

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने वादाला तोंड फुटलं आहे. याविरोधात आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.

काय आहे नमकं प्रकरण?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ८ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या आवारात पार्किंगमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. हा प्रकार काल रात्री उशिरा लक्षात आला. यानंतर विद्यापीठाचे सुरक्षारक्षक तिथे पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिसर मोकळा केला. आणि तिथे जाण्यास आता कुणालाही परवानगी नाही. सुरक्षारक्षक तिथे तैनात करण्यात आले आहेत.

आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करण्यात येत आहे. या परिसरात काल कोण-कोण गेलं? आणि कोणी हा मजकूर लिहिला? याचा शोध घेतला जात आहे. या घटनेवरून भाजपच्या संघटना आहेत, त्या आता आक्रमक झाल्या आहेत. भाजपकडून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच चतुःशृंगी पोसिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा आणि संबंधितांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT