Ajit Pawar : दौंड शुगर; अजितदादांबाबत मराठा आंदोलकांचा मोठा निर्णय...

Daund Sugar Factory : आता अजित पवारांऐवजी गळीत हंगामाचा प्रारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune : मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणं टाळलं. अजितदादांच्या हस्ते आज (गुरुवारी) दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ होणार होता. समारंभास दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाने विरोध दर्शविला होता. आता मराठा समाजाने त्यांच्या विरोधातील आंदोलन मागे घेतलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Shirdi News: विखे, थोरात-कोल्हे युतीची एकमेकांविरोधात 'साखर पेरणी'!

अजितदादांच्या उपस्थितीत बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगाम होणार होता. माळेगावला मराठा क्रांती मोर्चाने विरोध केल्यानंतर पवारांनी जाणं टाळलं. आता अजितदादांना आजारी असल्याने मराठा समाजाने पुकारलेले निषेध आंदोलन रद्द केल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी घेतला आहे. आता अजित पवारांऐवजी गळीत हंगामाचा प्रारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे.

दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दौंड तालुक्याच्या निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे यांना एका निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये हा विरोध नमूद केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत असताना आणि आंदोलनाचा एक भाग म्हणून पुढाऱ्यांना गावबंदी असल्याने हा विरोध केला आहे.

"आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित केले आहे. कार्यक्रमाच्या पत्रिका वितरित झाल्या आहेत व नियोजित वेळेप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होईल," असे दौंड शुगर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले आहे.

Ajit Pawar
ED Raids on Rajkumar Anand : केजरीवालांचा आणखी एक मंत्री ED च्या रडारवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com