RPI Leader M.D Shewale passed away
RPI Leader M.D Shewale passed away Sarkarnama
पुणे

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे यांचं निधन

सरकारनामा ब्यूरो

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे (RPI) (आठवले गट) ज्येष्ठ नेते व पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार मधुकर धर्माजी उर्फ एम. डी. शेवाळे (M.D. Shewale) (वय ७८) यांचे मंगळवारी (ता.17 मे) सायंकाळी निधन झाले. दलित चळवळीत सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय होते. (RPI Leader M.D Shewale passed away Marathi News)

शेवाळे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. शेवाळे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता कॅंप परिसरातील धोबीघाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी नाना पेठेतील आंबेडकर कॉलेजजवळील महात्मा फुले शाळेजवळून त्यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ होईल. शेवाळे मूळचे पुण्यातील. कॅंप परिसरातील भीमापुरा येथे ते राहत. ‘दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’या शिक्षण संस्‍थेचे ते सेक्रेटरी होते. सुमारे ४० वर्षांपासून ते या संस्थेत सक्रिय होते.

शेवाळे यांनी सुरवातीच्या काळात दलित उद्धारक पक्षाची स्थापना केली. नंतर त्यांनी दलित टायगर हा पक्षही स्थापन केला. गेल्या ३० वर्षांपासून ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याबरोबर काम करीत होते. राज्यभर त्यांचा संचार असे. काही वर्षांपूर्वी त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढविली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT