Sharad Butte Patil Attack sarkarnama
पुणे

Sharad Butte Patil Attack : मतदानाच्याआधीच मोठा राडा, शरद बुट्टे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला, शेकडो लोक रस्त्यावर; पत्नी निवडणुकीच्या मैदानात म्हणून...

ZP Elections Sharad Butte Patil : जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता बुट्टे-पाटील यांचे पती शरद बुट्टे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Roshan More

Sharad Butte Patil News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना आंबेठाण पाईट गटात रात्री मोठा राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद बुट्टे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. बुट्टे पाटील यांच्या पत्नी  आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढत आहेत. शरद बुट्टे पाटील यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा विरोधी गटाकडून करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या हल्ल्यानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परस्थिती आटोक्यात आणली. शरद बुट्टे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती आहे.

दरम्यान, बुट्टे पाटील यांच्यावरील हल्ल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. पोलिसांनी कठोर कारवाई करत हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी देखील तपास सुरू केला असून लवकरच हल्लेखोरांना जेरबंद केले जाण्याची शक्यता आहे.

शरद बुट्टे पाटील हे भाजपमध्ये होते. मात्र, निवडणुकीच्या आधी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खेड तालुक्यातील आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटातून त्यांची पत्नी सुनिता बुट्टे-पाटील यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. मात्र, मतदानाच्या आदल्या रात्री शरद बुट्टे पाटील यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली. त्यांना उपचारासाठी वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT