Leopard Attacks : राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकरांच्या पुत्रावर बिबट्याचा हल्ला; नागरिकांमध्ये भीती

Adhiraj Patil Udaysingh Patil Undalkar : जिल्हा परिषद मतदानाच्या आदल्या दिवशी कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेण्यासाठी गेलेल्या अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.
Adhiraj Patil Undalkar injured after a leopard attack, raising concerns over wildlife safety in Maharashtra.
Adhiraj Patil Undalkar injured after a leopard attack, raising concerns over wildlife safety in Maharashtra.sarkarnama
Published on
Updated on

Adhiraj Patil News : कराड तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला केला. उंडाळे भागातील शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात अधिराज यांना दुखापत झाली असून ते जखमी आहेत.

कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटातून उदयसिंह पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी रात्री या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिराज शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेले होते. तेथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ते परत येत होते. धनाजी पाटील हे त्यांच्यासोबत होते.

उंडाळे ते शेवाळेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेत अधिराज पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये अधिराज यांच्या पायाला जखम झाल्या आहेत. या घटनेनंतर धनाजी पाटील व अधिराज पाटील हे तातडीने उंडाळ्यात आले. त्यांना उपचारासाठी उंडाळेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Adhiraj Patil Undalkar injured after a leopard attack, raising concerns over wildlife safety in Maharashtra.
Sunetra Pawar Vote : अजितदादांशिवाय पहिलीच निवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्का; पवार कुटुंबीय एकत्र

मतदानाला सुरुवात

उदयसिंह पाटील-उंडाळकर पाटील हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे.

Adhiraj Patil Undalkar injured after a leopard attack, raising concerns over wildlife safety in Maharashtra.
Eknath Khadse News: एकनाथ खडसेंना कोर्टाचा दणका; आधी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला, आता थेट अजामीनपात्र वॉरंट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com