Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Vs Ajit Pawar : बारामतीवरून शरद पवारांचा प्रश्न, अजितदादांनीही दिलं उत्तर; पुण्यातील बैठकीत काय झालं?

Pune Planning Committee : पुण्यातील जिल्हा नियोजन बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला.

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : पुणे जिल्हा नियोजन बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या प्रश्नानंतर उभय नेत्यांमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचेही बैठकीत दिसून आले.

जिल्हा नियोजन बैठकीला अनेक दिवसांनंतर पवार कुटुंबातील शरद पवार Sharad Pawar, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले होते. त्यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काही प्रश्न केले. त्याला अनुसरुन अजितदादांनी उत्तरेही दिली. शरद पवार यांनी अजितदादांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीबाबतच प्रश्न केला.

बारामतीत दूषित पाणी येत असल्याकडे शरद पवारांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, बारामतीत प्रदूषित पाण्याचा पुरवठा होतोय. त्यावर कारवाई करा, असे पवार म्हणाले. त्यावर अजित पवारांनी, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून उत्तर दिले.

ते म्हणाले, दिलीपराव, याकडे तुम्हाला लक्ष घालावे लागेल. त्यामध्ये सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना, श्रीराम कारखाना, यासह काही दुधाचे प्लॅन्ट प्रक्रिया न करताच पाणी सोडतात.

या कारखान्यांना सातत्याने सांगतोय की, एसटीपी आणि सीपीयू हे प्लॅन्ट बसवा. मात्र त्याकडे ते दुर्लक्ष करत आहे. त्यांना तशी समज देऊन या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन अजित पवारांनी Ajit Pawar दिले.

या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, पुणे जिल्ह्यातील मावळला निधी दिला जातो, तर शिरूर आणि बारामतीला दिला जात नाही. मावळला दिला जातो तो मान्यच आहे, पण शिरूर आणि बारामतीकडे दुर्लक्ष नको, असे आवाहनही सुळेंनी केले. यावरून मावळचे आमदार सुनील शेळके आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT