ीPune News : अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युवकांशी थेट संवाद साधला. या वेळी पुण्यात पवारांची पॉवर पाहायला मिळाली. तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने बालगंधर्व रंगमंदिराचं सभागृहदेखील अपुरे पडले, त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट मंचावरच ठाण मांडलं.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीतर्फे करण्यात आलं होतं. या वेळी पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, प्रशांत जगताप हे मंचावर होते. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना प्रश्न विचारले त्यावेळेस दिलखुलासपणे शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अतिशय कमी आहे, याचं काय कारण असावं, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने शरद पवार यांना विचारला. त्यावर पवार म्हणाले, महिलांना कमी लेखण्याची गरज नाही. कर्तृत्व तुम्ही महिला आहे की पुरुष यावर ठरत नाही. महिलांमध्ये कर्तृत्व आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. संरक्षण दलात महिलांच्या समावेशाचा निर्णय मी घेतला. आज दिल्लीत होणाऱ्या परेडचे नेतृत्व महिला करत आहेत.
निवडणूक एप्रिलमध्ये होणार हे माहीत असताना आयोगाने परीक्षा एप्रिलमध्येच ठेवल्या. त्यांना परीक्षेची तारीख ठरवताना हे लक्षात आले नाही का? त्यावरही शरद पवार म्हणाले, निवडणुकीच्या तारखा माहीत असताना राज्य लोकसेवा आयोगाने नीट नियोजन करणे आवश्यक आहे. शहाणपणाने निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र, तो निर्णय योग्य न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. निवडणूक झाल्यावर आपण त्यावर काम करू शरद पवार यांनी आश्वासन दिले.
या वेळी विद्यार्थ्यांनी भरती परीक्षा वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी शरद पवारांकडे केली त्यावर पवार म्हणाले, राजस्थान सरकार वय वाढवून देण्याचा निर्णय घेऊ शकत असेल तर महाराष्ट्र सरकार का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत व्हाव्यात, अशी सगळ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली. त्यावर सर्व परीक्षा 'एमपीएससी' मार्फत व्हाव्यात. कंत्राटी पद्धतीने पदभरती बंद करावी. कायमस्वरूपी नोकरी द्यावी. प्रलंबित नोकरभरती पूर्ण करावी. महाराष्ट्रात उद्योग, व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न असल्याचं या वेळी शरद पवार यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.