Jayant Patil : 'हसन मुश्रीफ पैशांनी गब्बर...' जयंत पाटलांचा हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणणार असे वक्तव्य केले होते. त्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, हेलिकॉप्टरने मतदार आणू, असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरवलं आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत असून, नेत्यांकडून विविध विधाने समोर येत आहेत. नुकतच हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी वेळ पडल्यास मतदारांना हेलिकॉप्टरने आणू, परंतु महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊन देणार नाही, असं वक्तव्यं केलं होतं. या वक्तव्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी समाचार घेतला आहे.

पुण्यातील शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी आज सकाळी जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला जयंत पाटील म्हणाले, महायुतीतील जागांचा तिढा लवकर सुटायला हवा शिवसेना काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बारामतीची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार नसून नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरुद्ध राहुल गांधी असं असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, फडणवीस यांचे विधान हास्यास्पद आहे. ही लढाई कोणाच्या विरोधात आहे. हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे. बारामतीकर त्याच प्रश्नाचा त्या पद्धतीने उत्तर देतील. मात्र देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीचा बदलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. कदाचित सर्व्हेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कम्पॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न दिसतोय असे जयंत पाटील म्हणाले.

फडणवीस यांनी माने कुटुंबीयांची घेतलेल्या भेटीबाबत जयंत पाटील म्हणाले, माने कुटुंबीय पवारसाहेबांचे कट्टर समर्थक राहिले आहेत. त्यांना कधीही विचारलं तरी 200% खात्री आहे की ते पवारसाहेबच म्हणतील. परंतु वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर देऊन त्यांच्यावर प्रेशराईस करण्याचा प्रयत्न झाला असेल, असं मला वाटत असल्याचं जयंत पाटील यांनी खुलासा केला.

Jayant Patil
Kolhapur Hasan Mushrif News : 'मंडलिकांची अडचण होईल असे कुणीच काही करू नका'; हसन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना सुनावले

हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरमधून याबाबतचे वक्तव्य केले आहे, त्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, हेलिकॉप्टरने मतदार आणू असं म्हणणं म्हणजे मतदारांची सगळी व्यवस्था करायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर घबाड दिसतंय, त्यामुळे ते मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्याची तयारी दाखवत आहेत. यातून आमचे विरोधक पैशाने किती गब्बर आहेत. किती प्रचंड मोठी त्यांच्याकडे ताकद आहे.. हे दिसतंय.. महाराष्ट्रातील जनतेला हे उदाहरण लक्षात आणून देणार आहेत, की प्रचंड माया समोरच्या बाजूने गोळा करण्यात आली... आम्ही जनतेच्या साथीने निवडणुकीला सामोरे जातोय... विकास आघाडीच्या पारड्यात मत टाकेल आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणाले. Kolhapur Loksabha News

म्हाडा आणि साताऱ्याच्या जागेवरती लवकरच निर्णय होणार असून, तो निर्णय झाल्यानंतर पुढच्या वेळेस सांगतो असंदेखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. बीड येथील बजरंग पाटील यांच्याबाबत जयंत पाटील म्हणाले, ते आधीपासूनच आमच्या पक्षात होते ते कुठेही गेलेले नव्हते. त्यांना पुन्हा कार्यरत करण्याचं काम आम्ही केलं. लोकसभेच्या प्रत्येक बूथवर लढण्याचा त्यांचा अनुभव आहे. पवारसाहेबांविषयी त्यांची आत्मीयता पूर्वीपासूनच आहे.

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) बाबतची चर्चा आता बरीच पुढे गेली आहे. त्यामुळे त्याच्यांवरती अधिक उत्तर देणे योग्य ठरणार नाही. मात्र, त्यांनी बारामतीत पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी मानतो. अन्य जागांवरही त्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.. पण त्यांच्याही काही मर्यादा असतील त्यांचाही पक्ष आहे. त्यामुळे वेगवेगळे उमेदवार उभा करण्याचा त्यांनी ठरवलेले दिसते, असं जयंत पाटील म्हणाले.

R

Jayant Patil
Lok Sabha Election 2024 : संभाजीनगर शिंदेंकडेच, 'मामां'च्या नावावर शिक्कामोर्तब; भाजप काय भूमिका घेणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com