Sharad Pawar, Amit Shah Sarkarnama
पुणे

Sharad Pawar Amit Shah : रामलल्लाच्या नावाने मते मागणाऱ्या अमित शाहांना पवारांनी दाखवला आरसा

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये निवडणुकीनिमित्त भाजप आणि काँग्रेसने प्रचाराची राळ उठवली आहे. दोन्ही पक्षांकडून मोठमोठ्या घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आले तर राज्यातील लोकांना अयोध्या येथील नव्याने होणाऱ्या राम मंदिरातील रामलल्लाच्या दर्शनाची मोफत सोय केली जाईल, असे अश्वासन दिले. या घोषणेनंतर विरोधकांनी शाह यांच्यावर टीकेची राळ उठवली आहे. (Latest Political News)

देवाच्या नावाने मते मागणाऱ्या भाजप नेत्यांच्या प्रवृत्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी सडकून टीका केली आहे. ते बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मध्य प्रदेशमधील प्रचारात अमित शाहांनी केलेल्या घोषणेबाबत पवार म्हणाले, 'अमित शाहांची घोषणा ही मतांसाठी नको, त्या गोष्टी कबूल करण्याचे उत्तम उदाहरण आहे. उद्या हे राम मंदिर झाले, तर देशातील कुणीही येऊन रामाचे दर्शन घेऊ शकतो. त्यासाठी सरकारने कुठलेही धोरण आखायची गरज नाही,' असे म्हणत पवारांनी शाहांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

या वेळी पवारांना राज्यातील मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्राने निर्णय घेण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न राज्य आणि केंद्र सरकार यांच्या अखत्यारीतील आहे. बारामतीतील उपोषणकर्त्यांशी खासदार सुप्रिया सुळेंनी चर्चा केली. त्यांनी समंजस्यपणाची भूमिका घेत काही प्रश्न मांडले. ते केंद्राचे असतील तेथे मांडावे लागतील. दुसरीकडे मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच्यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारचा आहे. लोकांच्या या भावना तेथप्रर्यंत पोहाेचवण्याचे काम आम्ही काम करू, अशी ग्वाहीही पवारांनी दिली.

जातीचा उल्लेख असणाऱ्या व्हायरल प्रमाणपत्राबाबत शरद पवारांनी या वेळी खुलासा केला. ते म्हणाले,' जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपू शकत नाही. माझा मराठा एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल शाळेचा दाखला खरा आहे. त्यावरील जात, धर्माचा केलेला उल्लेख आहे. मात्र, काही लोकांनी इंग्रजीतील दाखल्यात जातीपुढे ओबीसी लिहून ते व्हायरल केले. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि आस्था आहे. मात्र, जात-धर्म या विषयावर कधी समाजकारण आणि राजकारण केले नाही. त्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जो काही हातभार लावायचा तो लावेल,' असेही पवार यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT