Sharad Pawar Baramati : शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कान टोचले; म्हणाले, 'राज्याच्या प्रमुखाने...'

Eknath Shinde : मनोज जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री लवकर निर्णय घेतील
Sharad Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Baramati Political News : शिवसेनेच्या मुंब्रा येथील शाखेवर शिंदे गटाकडून बुलडोझर पाडल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परिणामी ठाण्यासह राज्यातील वातावरण चांगलेच गरम झाले. यावर बोलताना राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कान टोचले आहेत. (Latest Political News)

बारामती येथील पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातील कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जायला हवे, असे म्हणत पवारांनी शिंदेंवर निशाणा साधला.

पवार (Sharad Pawar) म्हणाले, 'ठाणे जिल्हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा गड आहे. तेथे शिवसेनेची संघटना मजबूत आहेत. मात्र, तेथील शिवसेनेचे कार्यालय बुलडोझर आणून फोडले गेले. राजकारण करताना असल्या गोष्टी टाळाव्यात. विशेषतः मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यातील सर्वांना बरोबर घेऊन चालावे, हेच लोकांना अपेक्षित असते. त्यामुळे कार्यालये तोडणे, उद्ध्वस्थ करणे ही भूमिका योग्य नाही.'

Sharad Pawar, Eknath Shinde
Nagar Politics : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राडा होण्याची चिन्हे, विखेंसह उत्तरेतील नेते आमने-सामने!

राज्यात सर्वत्र दुष्काळीस्थिती असताना मात्र सरकारकडून काही तालुके वगळण्यात आले आहेत. परिणामी शेतकरी वर्गात असंतोष आहे. यास राज्य सरकारला जबाबदार धरत पवार म्हणाले, दुष्काळ जाहीर करताना राज्याच्या स्थितीची योग्य पद्धतीने माहिती केंद्रापर्यंत राज्य सरकारने पोहाेचवली नाही. हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहाेचवला आहे. त्यानुसार स्थितीचा अहवलात दुरुस्ती करण्याचा मुद्दा त्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे येत्या दोन-चार दिवसांत काहीतरी निर्णय होईल, अशी अशा आहे.'

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ही मनोज जरांगेंची मागणी पूर्ण होईल, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. या वेळी पवारांनी सांगितले की, 'याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्यासाठी मला आमंत्रण होते. त्यावेळी विविध पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. तेथे मुख्यमंत्र्यांनी जरांगेंची मागणीची पूर्तता करण्याचे पाऊल टाकणार असल्याचे सांगितले. आता तो निर्णय लवकर आला तर त्यांची मागणी पूर्ण होईल.'

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar, Eknath Shinde
NCP Pandharpur: पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे पक्ष विस्ताराचे आव्हान; अभिजीत पाटलांचा लागणार कस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com