Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके हे कोणत्या गटात आहे, हे स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्रर तालुक्यात राजकीय वर्तुळातही संभ्रम आहे. जुन्नरमधून कोण उमेदवार असणार, या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज (रविवारी) दिले. जुन्नरचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असे ते म्हणाले. "जे भाजपसोबत गेले ते राष्ट्रवादीचे असू शकत नाहीत. महाविकास आघाडीत जुन्नरची जागा ही राष्ट्रवादीची आहे. या जागेच्या उमेदवारांबाबत मी निर्णय घेणार आहे," असे पवार म्हणाले.
आदिवासी चौथरा तथा काळा चबुतरा अभिवादन दिनानिमित्त बिरसा ब्रिगेडने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषदेसाठी शरद पवार हे जुन्नरला आले होते. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार आणि आमदार अतुल बेनके यांनी आज एकत्र जेवण केले. ते म्हणाले "महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची जागावाटपाची बोलणी होणार आहे. हा मतदारसंघ आपल्याकडेच म्हणजेच मी ज्या राष्ट्रवादी पक्षाचा संस्थापक आहे, त्या पक्षाकडेच राहणार आहे,"
"मी महाराष्ट्रात फिरतोय. सर्वसामान्य माणूस काय विचार करतो हे आम्हाला दिसतेय, तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलेल्या बंडाबाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे हे जनतेला माहिती आहे. लोक आमच्या बाजूला अनुकूल आहे," असे पवार म्हणाले.
अतुल बेनके यांचा कल अजित पवार यांच्या गटाकडे असल्याची चर्चा आहे. ते अजित पवारांबरोबर राहिले तर ही जागा त्यांना मिळणार असल्याचे बोलले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
आंबेगावला सभा होणार
दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिली सभा शरद पवार हे आंबेगावमध्ये घेणार होते. पण त्यांनी येवला येथे सभा घेतली. त्याबाबत विचारले असता आंबेगावला सभा होईल, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांबाबत वाद निर्माण करू नये, असे पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.