Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar On Ajitdada :अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकले.....

सरकारनामा ब्यूरो

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सातत्याने चर्चा होतात, हे बरोबर आहे. पण, कधी काय घडलं आहे का? असा सवाल करून ‘त्यांच्याबाबत वेगळी चर्चा नको,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar clearly stated on the discussion of Ajit Pawar going with BJP.....)

अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार (Sharad Pawar) हे बारामतीत बोलत होते. ते म्हणाले की, काही लोक प्रचार करतात, तर काही लोकांच्या कामाच्या पद्धती असतात. मी वेळ असेल तेव्हा माध्यमांना वेळ देतो. अजित पवार यांचा फील्डवर काम करण्याचा ॲप्रोच आहे. निर्णय घेण्याबाबतचा आहे. तो काही मिडीया फ्रेंडली नाही, हे मी तुम्हाला स्वच्छ सांगतो.

काही लोक असे असतात की, ते फक्त कामच करतात, तर काही जण फक्त नावासाठी प्रयत्न करतात. अजित पवार यांना प्रसिध्दीची कधीच चिंता नसते, तर हातात घेतलेले काम पूर्ण करण्याची त्यांना चिंता असते. हा फरक आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल असे होते. ते राष्ट्रवादीचेच काम करत असून राज्य व पक्षासाठी त्यांचे काम अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत वेगळी चर्चा नको, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपला पर्याय देण्यात माझा सक्रीय सहभाग

कोणताही एक राजकीय पक्ष देशात भाजपला पर्याय देऊ शकत नाही, त्यामुळे अनेक पक्षांनी एकत्र येण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणावी लागेल. या बात नितिशकुमारांसह अनेक जण काम करत असून कॉमन मिनिमम प्रोग्रामवर काम सुरू आहे. या सर्वांना मदत करुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपला पर्याय उभा करता आला तर त्याची जास्त गरज आहे. आणि या कामात माझा सहभाग असेल, असेही पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले की, बारसू प्रकरणात उद्योगमंत्री व प्रशासनासोबत माझ्याही दोन बैठका झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूकही होईल आणि राज्याच्या विकासालाही चालना मिळेल, असा मध्यम मार्ग कसा काढता येईल, असा प्रयत्न होता. पर्यावरण व शेतीचे नुकसान न करता काय मार्ग काढता येईल, या साठी पूर्ण तयारी करुन स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. पोलिस बळ वापरुन प्रकल्प यशस्वी होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT