पुणे

भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू : शरद पवार

केंद्र सरकार सामान्य जनतेला महागाईच्या दरीत ढकलत असल्याची टीका

सरकारनामा ब्युरो

पिंपरी चिंचवड : केंद्र सरकारला (Central Government) सर्वसामान्य जनतेविषयी कोणतीही आस्था नाही. केंद्र सरकार सामान्य जनतेला महागाईच्या दरीत ढकलत आहे. गेल्या काही काळापासून दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. राज्यसरकारने केंद्राला कोळश्याचे (Coal) तीन हजार कोटी दिले नाहीत म्हणून केंद्राने राज्याचा कोळश्याचा पुरवठा थांबवला, पण केंद्राकडून राज्याला ३५ हजार कोटी जीएसटी'चे (GST) येणं बाकी आहे. मात्र केंद्र हे राज्य सरकारवरच आरोप करत आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रावर निशाणा साधला.

शरद पवार आज पिंपरी चिंचवड (Pimpri- Chinchwad) दौऱ्यावर आहेत, पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रसरकार सह केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईवर आणि राज्यातील विरोधी पक्षावरही हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्रसरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. सीबीआयला कारवाई करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र मात्र केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेचा गैरवापर करुन सीबीआय, ईडी, आयकर, नार्कोटिक्स कंट्रोल यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर केला जात आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टिकेला उत्तरही दिले. आघाडी सरकार स्थापन करण्यात माझाही सहभाग होता. आघाडी सरकार स्थापन करताना सगळ्या आमदरांच्या बैठकीत नेतृत्त्व कोणी करावे यासाठी तीन नावे समोर होती. उद्धव ठाकरे नेतृत्त्व करण्यासाठी तयार नव्हते. पण मी त्यांचा हात वर केला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा व्यक्तिगत सलोखा होता. बाळासाहेबांशी असलेल्या सलोख्यामुळे त्याच्या चिरंजिवाला संधी मिळावी हा माझा आग्रह होता. त्यामुळे मी पुन्हा येणार असे म्हणणारे देवेंद्र फडणीवसांनी अशा कोणत्याही गोष्टीवर आक्षेप घेऊ नये.

मी पुन्हा येणार म्हणणारे देवेद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते फडणवीस त्यांच सरकार गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी तपाास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, तर केंद्रसरकारही राज्यावर दोषारोप करण्यात व्यस्त आहे. पण हे सरकार कधीही हरणार नाही, केंद्राने कितीही छापे मारावेत. असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.

तसेच, अजितपवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. शेवटपर्यंत महाविकास आघाडीचे नेतृत्त्व शिवसेनेकडेच राहणार, असे म्हणत त्यांनी आघाडीचे सरकार जनतेचा विश्वास जिंकून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचचं सरकार येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT