Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी बारामतीवरुन पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पवारांना छातीत संसर्ग आणि श्वास घेण्यास अडचण येत असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सहा दिवसांच्या उपचारानंतर शरद पवारांना रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयाकडून शनिवारी (ता.14) डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी पवारांची प्रकृती आता व्यवस्थित असल्यामुळेच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार यांना 9 फेब्रुवारी रोजी खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानं तातडीनं बारामतीहून रुबी हॉल क्लिनिकला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये शरद पवारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवस वैद्यकीय चाचण्या आणि उपचार करण्यात आले. याबाबत रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रँट म्हणाले, शरद पवारांच्या प्रकृतीत आता लक्षणीय सुधारणा झाली असल्यानेच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण याचवेळी काही दिवस पुरेशा प्रमाणात आराम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
शरद पवार पुरेशा विश्रांतीनंतर पूर्ववत आपली दैनंदिन कामं करू शकणार आहे. तसेच त्यानंतर त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांतही सहभागी होता येणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार हे रुग्णालयात दाखल होताच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवारांच्या डिस्चार्ज दिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आदरणीय पवार साहेब यांची तब्येत बरी असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. त्यांना तीन चार दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानुसार ते घरीच आराम करणार असून त्यानंतर ते आपल्या दैनंदिन कामास सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे.
पुढे सुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, साहेबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या काळात देश आणि राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर आणि त्यांच्यावर प्रेम करणारे नागरीक यांनी शुभेच्छा पाठविल्या. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
यासोबतच आदरणीय पवारसाहेब यांच्यावर उपचार करणारे तसेच त्यांची काळजी घेणारे रुबी हॉल क्लिनिक येथील डॉक्टर्स, परिचारिका, सपोर्टींग स्टाफ यांचेही मनापासून मनापासून आभार सुळे यांनी मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.