shivsena Leader resignation : शिवसेनेच्या बड्या नेत्याचा 'राजीनामा बॉम्ब', शिलेदाराच्या तडकाफडकी निर्णयाने खळबळ अन् केसरकरांना धक्का

deepak kesarkar Aide sachin walawalkar resignation Politics : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत बड्या नेत्याने शुक्रवारी आयोजित पक्षाच्या मासिक सभेतच तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
shivsena Leader sachin walawalkar resignation; MLA deepak kesarkar
shivsena Leader sachin walawalkar resignation; MLA deepak kesarkarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ला येथील सभेत अचानक राजीनामा जाहीर केला.

  2. दीपक केसरकर आणि संजू परब यांनी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न केला.

  3. पुढील दोन दिवसांत वालावलकर यांचा अंतिम निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना समन्वयक सचिन वालावलकर यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वेंगुर्ला येथे आयोजित पक्षाच्या मासिक सभेत शिलेदाराने अचानक असा 'राजीनामा बॉम्ब' टाकल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची मोठी धांदल उडाली. वालावलकर हे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय सहकारी मानले जातात. तर वालावलकर यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने केसरकर यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान केसरकर यांनी त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून निर्णय मागे घेण्याबाबत चर्चा केली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी देखील वालावलकर यांची भेट घेत तब्बल दोन तास त्यांच्याशी चर्चा केली असून चर्चा निष्फळ ठरल्याची कुजबूज आहे. दरम्यान आता वालावलकर यांनी "मी शिवसैनिक म्हणून सदैव आपल्या सर्वांच्या सोबत राहीन," असे सांगितले आहे. तर वालावलकर यांचे मन वळवण्यात केसरकर आणि परब यांना यश येते का याचे चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालानंतर तालुका शिवसेनेची वेंगुर्ला येथे मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. तालुका संघटक बाळा दळवी यांनी ही सभा आयोजित केली होती. यात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, पंचायत समिती सदस्य सुचिता वजराठकर, साक्षी नार्वेकर, नगरसेविका रीना म्हापणकर यांचा सत्कार वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

shivsena Leader sachin walawalkar resignation; MLA deepak kesarkar
Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांना दुहेरी धक्का : होमग्राऊंड हातातून निसटले अन् नितेश राणेंनी सावंतवाडीत उभे केले नवे सत्ताकेंद्र

यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजीनामा जाहीर करताना वालावलकर भावुक झाले होते. यानंतर उपस्थित पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले.

वालावलकर म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपण यश मिळविले. सर्वच निवडणुकांना सर्वांच्या सहकार्याने सामोरे गेलो. गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात काम केल्यानंतर आपण आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो पाहिजे. फक्त पक्षामध्ये काम करून चालत नाही, तर पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय तळागाळात पोहोचविणे व कार्यकर्त्यांना सहकार्य करणे, हे आपले काम आहे.

पक्षासाठी जीव तोडून काम केल्यानंतर संघटनेतून वेगवेगळ्या गोष्टी कानावर येत असतील तर आपण कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे कोणावरही रोष न ठेवता मी पक्षाचा राजीनामा देत आहे. यानंतर एक सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक म्हणून काम करणार; मात्र पक्षाचे कोणतेही पद स्वीकारणार नाही. यावर आपण ठाम आहे.’’

वालावलकर यांनी राजीनामा दिल्यानंतर उपस्थित सर्वच पदाधिकारी भावुक झाले. नवनिर्वाचित सदस्य यज्ञा साळगावकर, सुचिता वजराठकर, साक्षी नार्वेकर, नगरसेविका लीना म्हापणकर यांना अश्रू अनावर झाले. यावेळी वजराठकर यांनी आपल्याला हा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले. सुनील मोरजकर म्हणाले, ‘‘निर्णयावर आपण फेरविचार करावा. आपण पक्षात नसाल तर आपण सुद्धा पदाचा राजीनामा देऊ.’’ बाळा दळवी व सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांना असा निर्णय न घेण्याबाबत विनंती केली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, कोचराचे सरपंच योगेश तेली, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, तालुका सचिव संजय गावडे, ॲड. श्रद्धा परब-बाविस्कर, कार्मीस आल्मेडा, टीना आल्मेडा, विभागप्रमुख संजय परब, नयन पेडणेकर, मितेश परब यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दोन दिवसांत चित्र स्पष्ट : परब

दरम्यान, हा निर्णय घेताच आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क करून निर्णय मागे घेण्याबाबत चर्चा केली. यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वालावलकर यांची भेट घेत तब्बल दोन तास त्यांच्याशी चर्चा केली. येत्या दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, असे संजू परब म्हणाले.

शिलेदाराचा धक्का!

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्या असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. सध्या याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बांधणी सुरू असतानाच वालावलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वालावलकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून हा केसरकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. वालावलकर हे आमदार केसरकर यांचे अत्यंत विश्वासू आणि महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात.

shivsena Leader sachin walawalkar resignation; MLA deepak kesarkar
Deepak Kesarkar : तळकोकणात शिंदेंच्या शिवसेनेत तणाव? राजन तेलींचा थेट आमदार केसरकरांवर हल्लाबोल

FAQs :

1. सचिन वालावलकर यांनी राजीनामा कधी दिला?
शुक्रवारी वेंगुर्ला येथे झालेल्या मासिक सभेत त्यांनी तडकाफडकी राजीनामा जाहीर केला.

2. वालावलकर कोणाचे निकटवर्तीय मानले जातात?
ते माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय सहकारी मानले जातात.

3. राजीनाम्यानंतर कोणत्या नेत्यांनी चर्चा केली?
दीपक केसरकर यांनी फोनवरून चर्चा केली तर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली.

4. चर्चा निष्फळ ठरल्याची चर्चा का आहे?
दोन तासांच्या बैठकीनंतरही निर्णय मागे घेण्याबाबत स्पष्टता न आल्याने अशी कुजबूज आहे.

5. पुढे काय होऊ शकते?
पुढील दोन दिवसांत वालावलकर निर्णय कायम ठेवतात की मागे घेतात, याचे चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com