Sharad Pawar consoles Sunetra Pawar after paying tribute to Ajit Pawar in an emotional moment. sarkarnama
पुणे

Sharad Pawar : भावूक करणारा क्षण! अजितदादांच्या फोटो समोर शरद पवारांनी हात जोडले, डोळे पाणावले...

Sharad Pawar Emotional  Ajit Pawar : शरद पवारांनी अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये जात सुनेत्रा पवारांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Roshan More

Sharad Pawar News : अजित पवारांच्या निधाने पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पवारच्या कुटुंबीयांचे सात्वंन करण्यासाठी लोक बारामतीमध्ये येत आहे. अजित पवारांचे निवास्थान असलेल्या सहयोग सोयाटीमध्ये बुधवारी सायंकाळी थरथरत्या पावलांनी शरद पवार आले होते.

आपल्या लाडक्या पुतण्याच्या प्रतिमे समोर हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. या भावूक क्षणाला सगळे गहिवरून गेले, सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणवले होते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची शरद पवारांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. सहयोग सोसायटीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते.

बुधवारी दुपारी विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पाडली. या बैठकीला पार्थ पवार, जय पवार अजित पवारांची बहीण विजया पाटील तसेच विद्या प्रतिष्ठाण संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, अजित पवार विविध संस्थेत काम करत होते. त्या संस्थेतील रिक्त जागावर कुणाला संधी द्यायची यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांचा अंत्यविधी केला त्या चौथऱ्यावर जाऊन आज पुन्हा एकदा दादांना श्रद्धांजली अर्पण केली… एरवी विद्या प्रतिष्ठानमध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आनंदाने जाणं व्हायचं पण आता मात्र तिथं जाताना अंतःकरण जड होतं.. पाय उचलतानाही जड जातो. संस्थेच्या आवारात शिरताच जणू काय खायला उठतेय की काय अशी एक भयान शांतता जाणवते.

अजित पवारांचा शेवटचा संवाद समोर...

अजित पवार यांनी अपघातापूर्वी फोनद्वारे शेवटचा संवाद कोणसोबत साधला होता. हे समोर आले आहे. अजित पवार यांनी श्रीजीत पवार या कार्यकर्त्याच्या तक्रारीवर फोनवर बोलताना म्हणाले, 'आम्ही सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारे आहोत बाळा...', असे सांगितले. विमान अपघाताच्या 15 मिनिटेआधी दादांनी श्रीजीत पवार यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT