NCP (SP) News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या एकमेव नगरसेवकाने घेतला महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज!

Chhatrapati Sambhajinagar Mayor Election : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एकमेव नगरसेवकाने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज घेतल्याने भाजप-एमआयएम राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
NCP (Sharad Pawar faction) corporator Satindersingh Oberoi submitting nomination forms for mayor and deputy mayor posts at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation.
NCP (Sharad Pawar faction) corporator Satindersingh Oberoi submitting nomination forms for mayor and deputy mayor posts at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक निवडून आला आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी त्याने दोन्ही अर्ज घेत सर्वांनाच धक्का दिला. महापालिका निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक 57 नगरसेवक निवडून आले आहेत, एमआयएम 33 नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यापैकी कोणीही महापौर पदासाठीचा अर्ज पहिल्या दिवशी घेतला नाही. मात्र राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाने दोन अर्ज घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी येत्या 10 फेब्रुवारी विशेष सभा होणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून अर्जाचे वितरण सुरू झाले. सत्तेचा दावेदार असलेला भाजपाचा महापौरपदाचा उमेदवार ठरत नसल्याने पहिल्या दिवशी या पक्षाचा एकही नगरसेवक अर्ज घेण्यासाठी फिरकला नाही. पण महापालिका निवडणुकीत एकमेव नगरसेवक निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतिंदरसिंग (नवीनसिंग) ओबेरॉय यांनी महापौर, उपमहापौर या दोन्हीही पदांसाठी उमेदवारी अर्ज घेतले.

महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झाले तर 16 ला मतमोजणी झाली. त्यात भाजपने ऐतिहासिक यश मिळवत 57 जागा पटकावल्या. दरम्यान राज्य शासनाने महापौरपदासाठी आरक्षण सोडत काढली. त्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण निघाले. त्यामुळे महापौरपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. भाजपने चार नावे अंतिम केले असले तरी त्यातून कोणाला पसंती मिळेल हे गुलदस्त्यात आहे.

NCP (Sharad Pawar faction) corporator Satindersingh Oberoi submitting nomination forms for mayor and deputy mayor posts at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation.
Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेत महापौर पदाचा पहिला मान स्त्री शक्तीला; 'या' आहेत रेसमध्ये..

प्रशासनाने महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर केली असून, 10 फेब्रुवारीला त्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरणास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रांचे वितरण होणार असून या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पालिकेच्या सचिव कार्यालयात नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत.

NCP (Sharad Pawar faction) corporator Satindersingh Oberoi submitting nomination forms for mayor and deputy mayor posts at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation.
Chhatrapati Sambhajinagar Mayor: भाजपाकडे 'अब तक सत्तावन्न', MIMकडूनही महापौरपदावर दावा; इम्तियाज जलील चमत्कार घडविणार?

बुधवारी (ता.04) पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक सतिंदरसिंग (नवीनसिंग) मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी सचिव कार्यालयातून महापौर आणि उपमहापौरपदासाठी नामनिर्देशन पत्र घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com