Sharad Pawar on Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव एकताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थुंकले. हा प्रकार शुक्रवारी (ता. २) राऊतांच्या घरी घडला. त्यांच्या कृतीवर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राऊतांच्या निषेधार्थ शिवसेनेकडून राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राऊतांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी एका वाक्यताच राऊतांचा हा विषय मिटवला.
पुण्यात शुक्रवारी (ता. ३) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी देशासह राज्यातील घटनांवर भाष्य केले. दरम्यान, संजय राऊतांच्या कृतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. राऊतांनी केलेल्या कृतीमुळे राज्यातील वातावरणाबाबत पवार यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्यावर एका वाक्यातच विषय संपवून अधिक बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, "संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेली कृती हा काही राज्याचा किंवा राष्ट्राचा प्रश्न नाही. मी त्याबाबत भाष्यसुद्धा करू इच्छित नाही." यानंतर पवार यांनी या विषयावर जास्त बोलणे टाळले. दरम्यान, त्यांनी दिल्लीतील महिला कुस्तीगीरांबाबत केलेल्या ठरवाची माहिती दिली. तसेच ओडिशातील रेल्वे आपघाताबाबत सखोल चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीत झालेल्या ठरावाबाबत शरद पवार यांनी माहिती दिली. पवार म्हणाले, "दिल्लीत कुस्तीगीर (Delhi Agitation) मुलींवर जी काही अत्याचार झाल्याची तक्रार आहे, त्याची केंद्र सरकारने गांभिर्याने नोंद घ्यावी. दिल्ली सरकारने त्यात लक्ष घालावे. असा ठराव करण्यात आला आहे." तर ओडिशातील रेल्वे दुर्घटनेवर पवार म्हणाले, "ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची चौकशी व्हावी. त्यातून जे काही समोर येईल. त्यावर केंद्र सरकारने उपाययोजना करावी."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.