Shrikant Shinde on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी (ता. २ जून) पत्रकार परिषदेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते थुंकले होते. त्यांच्या या कृतीनंतर राज्यभरातून त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अनेक नेत्यांनी यावर भाष्य केले असले तरी श्रीकांत शिंदे याबाबत बोलले नव्हते. आता शिंदे यांनीही राऊतांच्या कृतीचा चांगलाच समाचार घेतला आहे.
विरोधकांच्या वागण्या-बोलण्यातून राज्याचे वातावरण दूषित होत असल्याची टीका श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी यावेळी केली. ते म्हणाले, "सुसंस्कृत महाराष्ट्रात विरोधकही एकमेकांचे नाव आदराने घेतले जात होते. त्या महाराष्ट्रात आज सर्व पातळ्या सोडल्या गेल्या आहेत. विरोधक सकाळपासून शिव्या देण्यास सुरूवात करतात ते झोपेपर्यंत थांबत नाहीत. यामुळे राज्याच्या वातावरण दूषित करण्याच काम सुरू आहे. " (Sanjay Raut News)
कुणी कितीही शिव्या दिल्या तरी आम्ही कामातूनच उत्तर देऊ, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. श्रीकांत शिंदे म्हणाले, "सत्ता येते सत्ता जाते. यापूर्वीही अनेक सत्ता उलथवल्या गेल्या. त्यानंतर पुन्हा ते सत्तेत आले. पण गेल्या दहा महिन्यांपासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण राज्यात सुरू आहे. कामाचे उत्तर कामानेच दिले पाहिजे. शिव्या शाप किंवा थुंकून हे काही होणार नाही. आम्ही कधीच पातळी सोडली नाही आणि सोडणारही नाही. कामातूनच उत्तर देणार." (Latest Marathi News)
सत्ता गेल्यापासून विरोधक वेड लागल्यासारखे वागत असल्याचा घणाघातही शिंदेंनी केला. ते म्हणाले, "आता जे सुरू आहे ते सर्व जनता पाहत आहे. सत्ता गेल्यानंतर विरोधक वेड लागल्यासारखे वागत आहेत. ते सर्व महाराष्ट्राची जनता पाहत आहे. राज्याची संस्कृती अशी कधीच नव्हती. ती आता बिघडवण्याचे काम काही लोक करीत आहेत. आपल्या केलेल्या कृतीमुळे इतर राज्ये आपल्याकडे कुठल्या नजरेने पाहणार? युवकांनी काय आदर्श घ्यायचा? यामुळे राजकारण्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन कसा होतोय? याचा विचार करावा लागणार आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.