Ajit Pawar, Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar: अजितदादा, ती चूक होती तर , आता असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत तुमच्यावर आहे? रोहित पवारांचा सवाल

MLA Rohit Pawar Taunts NCP Chief Ajit Pawar on Assembly Elections: आदरणीय दादा, खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती....

Sudesh Mitkar

Pune News :'लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं ही चूक होती,' असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत एक खुलासा केला आहे.अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा करीत आहेत.

या दौऱ्या दरम्यान एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत खुलासा केला आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवणे, ही एक मोठी चूक होती. राजकारण हे घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं सांगत माझ्याकडून थोडी चूक झाली असं अजित पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उभ करण्याचा पार्लमेंटरी बोर्डाकडून निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.या प्रतिक्रिया वरून आता रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोशल मीडिया पोस्ट मध्ये रोहित पवार म्हणाले, आदरणीय दादा, खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे. असं रोहित पवार म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT