Ashwini Kadam- Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : विधान परिषदेचा पराभव शरद पवार गटातील नेत्यांच्या जिव्हारी !

Sudesh Mitkar

Pune News : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुरस्कृत केलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.सर्व उमेदवार विजयी करून आणण्यासाठी महायुतीकडे संख्याबळ नसताना देखील अपक्ष आणि काँग्रेसचे आमदारांकडून झालेल्या क्रॉस वोटिंग मुळे हा विजय महायुतीसाठी सोपा झाला.

या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा असलेला एकमेव उमेदवार पराभूत झाल्याने हा पराभव शरद पवार पक्षांच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.महायुतीच्या नेत्यांनी घोडेबाजार करून हा विजय साकार केला असल्याची टीका शरद पवार गटाच्या शहर नेत्या अश्विनी कदम यांनी केली आहे.

कदम यांनी सोशल मीडिया (Social Media) वरती पोस्ट करून हा संताप व्यक्त केला आहे.राजकारणात स्वच्छ प्रतिमा ठेवून नेतृत्व करणं किती महत्त्वाचं असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शुक्रवारी झालेल्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत 'शेकाप'चे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला.

या पराभवात अनपेक्षित अस काहीच नव्हतं. कारण सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे नीती आणि नियम सर्व बाजूला करून ठेवले आहेत तर मग दुसरं काय घडू शकत. मात्र, महाविकास आघाडीने कोणतीही चुकीची गोष्ट न करता, लोकशाहीला अनुसरून प्रामाणिक, कुठलाही पक्षफूट न‌ करता अगदी नीती-नियमाने ही निवडणूक लढली यातूनच आपल्या पक्षाची उत्तम प्रतिमा आणि एकनिष्ठपणा लक्षात येतो.

मागील काही वर्षांपासून घोडेबाजार करून विजय मिळवणं ही विरोधकांची सवयच होऊन बसली आहे.सत्तेतील लोकांनी आपल्या प्रतिनिधींना थेट अलिशान हॉटेलमध्ये नेऊन त्यांची बडदास्त ठेवली जाते. जनतेच्या पैशाचा अमाप अपव्यय आणि पराभव होण्याची भिती यामुळे कोणत्याही थराला जाऊन सत्ताधारी वागत आहेत हेच यावरून दिसले.स्वकर्तृत्वावर निवडून येणं हे कठीण होत असल्यानं अशा प्रकारचं राजकारण सध्याला दिसून येतं.मात्र,कोणतीही परिस्थिती येवो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या मार्गाचा अवलंब कधीच करणार नाही.

मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सदस्या आहे. नगरसेविका तसेच महानगरपालिकेतील महत्त्वाच्या पदांवर मी काम केलेलं आहे. मात्र, अशा गैरमार्गाचा वापर करून कधीच आपण राजकारण केले नाही.आदरणीय शरद पवारसाहेबांची (Sharad Pawar) शिकवण ही कायम प्रामाणिक राहा आणि पक्षनिष्ठ राहा अशीच राहिली आहे.त्यामुळे राजकारणात कोणताही चुकीच्या गोष्टी न करता नागरिकांना उपयोग होईल असं समाजकारण करणं हे मी माझे कर्तव्य समजते, असं कदम म्हणाल्या.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT