IAS Pooja Khedekar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची होणार गच्छंती ?

Pooja Khedekar Update : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून काम करताना पूजा खेडकर यांनी केलेल्या उद्योगांची किर्ती थेट दिल्लीपर्यंत पोहचल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत आलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता असून या संपूर्ण प्रकरणामध्ये पूजा खेडकर दोषी ठरल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अशा पद्धतीने कारवाई होणाऱ्या त्या पहिल्या आयएएस अधिकारी ठरतील.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी केलेल्या 'प्रतापा'मुळे त्या सध्या जोरदार चर्चेत आल्या होत्या. आपल्या खासगी ऑडी कारवर त्यांनी अंबर दिवा लावला होता.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर ताब्यात घेत त्यांचे सामान बाहेर काढले होते. आयएएस अधिकारी असतानाही त्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळत नसल्याने खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना कडक शब्दात समज देखील दिली होती. त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली होती.

IAS Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल, कारण...

या तक्रारीनंतर दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्याशी बोलून त्यांना समजाविण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र त्यांच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल न झाल्याने अखेर जिल्हाधिकारी (Collector) दिवसे यांनी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला पत्र देत खेडकर यांचा अहवाल पाठविला होता. त्यामध्ये त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव मागण्यांची माहिती देत त्यांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांची वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) अधिकारी म्हणून काम करताना पूजा खेडकर यांनी केलेल्या उद्योगांची किर्ती थेट दिल्लीपर्यंत पोहचल्याने त्यांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती त्यांच्याबाबत आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेत संपूर्ण चौकशी करणार आहे. त्या आयएएस कशा पद्धतीने झाल्या याची देखील संपूर्ण तपासणी केली जाणार आहे.

या समितीच्या तपासामध्ये पूजा खेडकर दोषी आढळून आल्यास त्यांना आयएएस पदावरुन गच्छंती होण्याची शक्यता आहे. त्यांना या पदावर रुजू होऊ दिले जाणार नाही. तसेच खेडकर यांच्यावर फौजदारी कारवाई देखील होईल, असे केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग ही कारवाई करणार आहे.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar and Center Committee : पूजा खेडेकर यांच्यावरील आरोपांचा तपास करण्यासाठी केंद्राकडून विशेष समितीची स्थापना!

पूजा खेडकरांच्या कागदपत्रांचीही तपासणी होणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला जात आहे. आपण शारीरिक दृष्ट्या अपंग असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी युपीएससीकडे सादर केले. या प्रमाणपत्रामुळेच त्यांची आयएएस साठी निवड झाल्याची चर्चा सुरू आहे. तसेच त्यांच्या वडीलांचे वार्षिक उत्पन्न लाखो रूपयांच्या घरात असतानाही त्यांनी नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट घेतल्याचे समोर आले आहे. ही कागदपत्रे त्यांनी कशी मिळविली याची देखील चौकशी केली जाणार आहे. ही कागदपत्रे चुकीची आढळल्यास शासनाची फसवणूक केल्याप्रकणी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com