Pune News : महापुरुषांविषयी राजकीय नेत्यांकडून वारंवार केल्या जात असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, भाजप नेत्या चित्रा वाघ, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांचा समावेश आहे.
महापुरुषांविषयीच्या वक्तव्यावरुन कधी महाविकास आघाडी, तर कधी सत्ताधारी भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी करण्यात आल्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
सासवडमध्ये सत्यशोधक समाज परिषदेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी शरद पवार(Sharad Pawar) आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढा यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हरी नरके नेमकं काय म्हणाले ?
हरी नरके (Hari Narke) यांनी शरद पवारांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज यांच्याशी केली आहे. नरके म्हणाले,'' सयाजीराव गायकवाड हे जसे दरबारामध्ये महात्मा फुलेंना बोलवाताहेत. सगळ्या मान्यवरांना बसवताहेत आणि फुले हे शेतकर्यांचे आसूड वाचताहेत.
मला हे प्रारुप पुन्हा शरद पवार हे मुख्यमंत्री असताना पाहायला मिळालं. आणि शरद पवार ज्यापध्दतीने बाबा आढावांना बोलवायचे, आणि बाबा ज्या अधिकारवाणीने त्यांना सांगायचे हे पाहून मला असं वाटतं की, शरद पवार हे आजच्या काळातील शाहू महाराज आहेत तर बाबा आढाव हे आजच्या काळातील महात्मा फुले आहेत असं हरी नरके म्हणाले आहेत.
हरी नरकेंनी शरद पवारांची तुलना थेट शाहू महाराज आणि बाबा आढावांची महात्मा फुलेंशी केल्यानं भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
चित्रा वाघांकडून चंद्रकांतदादांची तुलना महात्मा फुलेंशी...
चित्रा वाघ यांनी महिलांशी संवाद सांधताना चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रात जितक्या चळवळी झाल्या जितकी आंदोलने झाली, त्याचे केंद्र पुणे राहिले आहे. आजच्या कार्यक्रमात नवीन सुरुवातही येथून झाली आहे. आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि हेमंत रासने यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.