Eknath Shinde : आदित्य ठाकरेंच्या ओपन चॅलेंजला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, ''अशी छोटी आव्हानं...''

Maharashtra Politics : कुणालाही तुम्ही आव्हानं देता. आम्ही आव्हानं पेलतच इथंपर्यंत आलो आहोत.
Eknath Shinde & Aaditya Thackeray
Eknath Shinde & Aaditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Vs Aaditya Thackeray News : ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान वरळीतून निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाला शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिले होते.मात्र, तरीदेखील आदित्य ठाकरेंचा आव्हान देणं सुरुच होतं.पण मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंच्या आव्हानावर थेट वरळीत येऊन पलटवार केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून त्यात प्रामुख्याने आदित्य ठाकरेंकडून शिंदेंवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री कसं प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. या निमित्ताने वरळीत शिंदे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे.

यावेळी शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray ) आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, काही लोकं सकाळी उठले की, गद्दार खोके येवढ दोनच शब्द बोलतात. तिसरा शब्दच काढत नाही. एकनाथ शिंदे अशी छोटी आव्हान स्वीकारत नाही. मोठी आव्हानं स्वीकारतो. ते आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही शाखाप्रमुख झालो. धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या तालमीत तयार झालो. कुणालाही तुम्ही आव्हानं देता. आम्ही आव्हानं पेलतच इथंपर्यंत आलो आहोत. आम्ही लोकांच्या मनातील सरकारची स्थापना केलेली आहे असंही शिंदेंनी यावेळी सांगितले.

Eknath Shinde & Aaditya Thackeray
Congress : अंतर्गत कुरबुरी तर सर्वच पक्षांमध्ये असतात, लवकरच निकाली निघेल ‘हा’प्रश्‍न !

आम्ही गुवाहाटीला होतो. तेव्हा काही लोकं म्हणाले, यायचं तर वरळीत येऊन दाखवा. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकटा आला. हेलिकॅप्टरनं न जात या रोडनं एकटाचं गेला. आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहे. आम्हाला काही आयतं मिळालेलं नाही, अशी टीकाही त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

Eknath Shinde & Aaditya Thackeray
Nagpur : आमदार साहेब लग्नासाठी मुलगी बघा; कारण मी शेतकरी म्हणजे फेकलेला जीव !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, कोळी समाज हा जीवाला जीव देणारा आहे. समुद्रांच्या लाटांशी सामना करणारा कोळी समाज हा इथला मूळनिवासी आहे. मी कोळी नसलो तरी या व्यवसायाशी माझं जवळचं नातं आहे. मी मासेविक्रीचा व्यवसाय पूर्वी केलेला आहे असेही शिंदे म्हणाले.

भाजप-शिवसेना युती म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं. पण, निकाल लागताच काही लोकं आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत असं म्हणाले. २०१९ ला व्हायला पाहिजे होतं. त्याची दुरुस्ती आम्ही केल्याचंही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com