Sharad Pawar, Chandrarao Taware
Sharad Pawar, Chandrarao Taware Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : शरद पवारांचा अजितदादांना शह? तब्बल 15 वर्षांनंतर 'या' राजकीय विरोधकाच्या भेटीला

कल्याण पाचांगणे

Baramati Political News : ज्येष्ठ नेते शरद पवारांनी जुने सहकारी, मात्र काळाच्या ओघात राजकीय विरोधक बनलेले, भाजप नेते आणि माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांची भेट घेतली. सर्व राजकीय मतभेत बाजूला ठेवत पवारांनी तावरेंशी तब्बल 15 वर्षांनतर 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. दरम्यान, चंद्रराव तावरे आणि अजित पवार Ajit Pawar यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे पवार-तावरेंची ही काही मिनिटांची भेट बारामती लोकसभेसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Sharad Pawar Meets Chandrarao Taware in Sangvi.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Pawar आणि खासदार सुप्रिया सुळे अशी नणंद भावजय लढत होत आहे. यातून पवार आणि अजित पवार हे दोघे एकमेकांचे शिलेदार आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील शरद पवार गटाचे नेते प्रवीण माने Pravin Mane अचानकच अजित पवार गटात सहभागी झाले. त्यानंतर पवारांनी दौंडमधील आमदार राहुल कुल यांचे कट्टर समर्थक प्रेमसुख कटारियांची Premsukh Katariya भेट घेतली. त्यानंतर बारामतीतील सहकारासह स्थानिक राजकारणावर पकड असलेल्या चंद्रराव तावरे यांची त्यांच्या सांगवी येथील निवासस्थानी जाऊन पवारांनी चर्चा केली आहे.

चंद्रराव तावरे Chandrarao Taware भाजपचे नेते असले तरी ते शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून ओळखले जातात. पक्षात फूट पडल्यानंतर पवारांना आपल्याच बालेकिल्ल्यात जुळवाजुळव करावी लागत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पवारांनी पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याचे बोलले जात आहे. पवार आणि तावरे यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मदतीच्या दृष्टीने या भेटीकडे राजकीय वर्तुळातून पाहिले जात आहे.

दरम्यान, तावरे यांनी पुरंदर, इंदापूर तालुक्यांप्रमाणे बारामतीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी Devendra Fadnavis वेळ देण्याची मागणी केली होती. फडणवीस आणि तावरेंची भेट होण्यापूर्वीच शरद पवारांनी पुढाकार घेत राजकीय वैर विसरून तावरेंच्या घरी गेले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, अॅड. एस. एन जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमुळे तालुक्यात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगवी येथील ज्येष्ठ विधितज्ज्ञ आर. ए. जगताप, लक्ष्मी सहकार संकुलचे संस्थापक भिकोबा तावरे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार Sharad Pawar सांगवीत आले होते. या वेळी तावरेंची त्यांनी भेट घेतली. पवारांच्या भेटीनंतर चंद्रराव तावरे म्हणाले, आमच्यातील भेट राजकीय नव्हती. सांगवीत पवारसाहेब इतर कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी माझ्या घरी भेट दिली. आमच्यात एकमेकांच्या तब्येतीबाबत चर्चा झाली. कौटुंबिक विचारपूस झाली. सरबत घेतला आणि पवारसाहेब गेले. यापेक्षा वेगळे काही झाले नाही, असेही तावरेंनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT