सागर आव्हाड
Loksabha Election : बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होतो आहे. याच मतदारसंघातून तृप्ती देसाई यांनी भाजपकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. कमळ चिन्हावर निवडणूक लढवून आपण सुप्रिया सुळे यांना पराभूत करू, असा आत्मविश्वास तृप्ती देसाईंनी व्यक्त केला होता. मात्र, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे बारामती मतदारसंघ महायुतीकडे असला तरी येथे कमळ चिन्हाbj निवडणूक न लढता भाजपने पळ काढला का? असा थेट सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वत: बारामतीमध्ये कमळ फुलवायचे आहे, असे जाहीर केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामती मतदारसंघात येऊन गेल्या होत्या. मात्र, अजित पवार महायुतीत आल्याने महायुतीतील उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत. जर भाजपने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी तो कमळाच्या चिन्हावर विजयी झाला असता, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात आता कौटुंबिक वाद सुरू झाला आहे. ही कौटुंबिक लढाई आहे. यामध्ये मतदारांना काय मिळणार? बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवू, असे भाजपने सांगितले होते. मी बारामतीतून इच्छुक होती आणि अनेक भाजपच्या नेत्यांनी माझी भेटदेखील घेतली होती. पण अचानक भाजपने यातून पळ काढला आणि राष्ट्रवादीला उमेदवारी दिली, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
ज्या पवार कुटुंबाला भाजपला पळवायचे होते, त्याच पवार कुटुंबाला एकमेकांच्या समोर आणले. त्यामुळे आत्ता जनतेने करायचे काय ? जनतेला वेड्यात काढायचे काम हे करत आहेत. बारामती मतदारसंघातून भाजपने पळ काढला आणि कुटुंबातील वाद जनतेवर लादण्यात आला आहे. भाजपनेदेखील पक्ष बारामतीत पवार कुटुंबाच्या दावणीला बांधला आहे, अशी जोरदार टीका तृप्ती देसाई यांनी भाजपवर केली.
(Edited By Roshan More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.