Supriya Sule on Sushma Andhare Sarkarnama
पुणे

Supriya Sule: पुण्यातील 'या' जागेवरुन आघाडीत बिघाडी? "सुषमाताई, त्या मीटिंगमध्ये होत्या का?

Hadapsar Assembly election 2024 Supriya Sule on Sushma Andhare: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वर्दीची भीती राहिली नाही. सरकारच्या धोरणांमुळे मंत्रालयातून सगळं कॉम्प्रमाईज होत आहे. त्यामुळे वर्दीची भीती राहिली नाही. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल.

Sudesh Mitkar

Pune News: एकीकडे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची जागा वाटपाबाबत खलबत्त सुरू असताना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभेच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केली आहे. यानंतर याबाबत आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सुषमा अंधारे यांना उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांनी देखील सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आगामी काळामध्ये सुषमा अंधारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा संघर्ष आणखी बळवण्याची शक्यता आहे.

पुण्यामध्ये पत्रकारांची संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पुण्यामधील महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता मनाला अत्यंत वेदना होत आहेत. बोपदेव घाटातील घटना ही अत्यंत संतापदायक आहे. त्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. पुणे आणि राज्यातली कायदा सुवव्येस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वर्दीची भीती राहिली नाही. सरकारच्या धोरणांमुळे मंत्रालयातून सगळं कॉम्प्रमाईज होत आहे. त्यामुळे वर्दीची भीती राहिली नाही. याचे उत्तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागेल. या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी तातडीने बापदेव यायला हवं होतं.

निवडणुकीत लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायला वेळ आहे. पण पीडितांसाठी वेळ नाही...गृहमंत् काय करताहेत असा सवाल सुळे यांनी केला.इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी मधील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भरत शहा आणि जगदाळे यांच्याशी काल आणि आज माझे बोलणं झाले आहे. तिन्ही नेत्यांशी माझे कौटुंबिक संबंध असल्याने त्यांचा मानसन्मान जपायची माझी नैतिक जबाबदारी आहे. प्रवीण माने यांना भाजपने कशी दमदाटी केली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. प्रवीण माने ना धमकी दिली आणि माझ्या विरोधात प्रचार करायला लावला. मात्र आमच्याकडून चर्चा सुरू आहे. चर्चेतून मार्ग निघतात, सगळ्यांबरोबर चर्चा करायची तयारी आहे. असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन पाटलांची अदृश्य मदत लोकसभा निवडणुकीमध्ये झाली का? या प्रश्नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, "बारामतीची जनता मायबाप आहे.अदृश्य शक्ती एक प्रेम असू शकते एक आशीर्वाद असू शकते. कुणी काही करु शकते, दमदाटी केलेली लोकांना नाही आवडत, ही लोकशाही आहे,"

सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहणार असून या मतदारसंघात महादेव बाबर हे उमेदवार असतील, असे घोषित केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणल्या, "सुषमाताई, त्या मीटिंगमध्ये होत्या का? त्यांना फोन करून विचारेन. माझ्या माहितीनुसार कालच्या बैठकीला त्या नव्हत्या. जोपर्यंत जागा वाटप फायनल होणार नाही, तोपर्यंत मी आऊट ऑफ लाईन बोलणार नाही. हा विकास आघाडीत कुठेही गैरसमज होईल, " असे वक्तव्य मी करणार नाही. जबाबदार खासदार आल्याचे सांगत सुषमा अंधारे यांना टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT