Mahayuti: महायुतीत फूट? शिवसेना करणार फडणवीसांकडे तक्रार; पदाधिकाऱ्यांची नाराजी

Mahayuti Split Pachora Bhadgaon Assembly election:निमंत्रण देऊनही मेळाव्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुलाबराव पाटील यांनी भाषणात याबाबत खंत व्यक्त केली आहे.
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाचोरा भडगाव मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) फूट पडल्याचे चित्र आहे. पाचोरा (Pachora) येथे शिवसेनेतर्फे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते.

निमंत्रण देऊनही मेळाव्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात याबाबत खंत व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या मेळाव्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली, याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे. वरिष्ठांकडे आजच्या मेळाव्याचे जे घडलं ते मी मांडणार आहे. महायुतीमध्ये अशा गोष्टी घडल्या तर त्याचा परिणाम हा संपूर्ण महाराष्ट्रावर होईल, अशी भीती गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

महायुतीच्या मेळाव्यात जो प्रकार झाला, याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Bajrang Sonwane: खासदाराच्या होमपिचमध्ये तिढा; उमेदवारी कुणाच्या पारड्यात पडणार?

लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र होतो, त्यामुळे दोन्ही जागांवर विजय मिळवता आला. त्याचप्रमाणे जर आपण विधानसभेत एकसंघ राहिलो तर जळगाव जिल्ह्यातील 11 ते 12 जागा निवडून येऊ शकतात, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. महायुतीत अशी फूट असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे आहे, असे ते म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगाव ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुसूंबा येथील शरद पवार गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सर्वांचे स्वागत केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com