nana patole | uddhav thackeray | sharad pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar : 'मुख्यमंत्रिपदा'बाबत शरद पवारांनी केलं भाष्य; म्हणाले, आमच्याकडे...

Akshay Sabale

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीत जागावाटप आणि 'मुख्यमंत्रिपदा'च्या चेहऱ्यावरून चढाओढ सुरू आहे. यातच ठाकरे गटाकडून पुन्हा उद्धव ठाकरे यांचा चेहरा 'मुख्यमंत्रिपदा'साठी चेहरा समोर लक्षात ठेवून निवडणुकीला सामोरं जावं, अशी मागणी केली जात आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी "शरद पवारसाहेब, नाना पटोले यांनी 'मुख्यमंत्रिपदा'चा चेहरा आत्ता जाहीर, करावा, मी पाठिंबा देतो," असं विधान केलं होतं. मात्र, मेळाव्यात नाना पटोले ( Nana Patole ) आणि शरद पवारसाहेबांनी 'मुख्यमंत्रिपदा'वर बोलणं टाळलं होतं. पण, आता शरद पवारसाहेबांनी 'मुख्यमंत्रिपदा'वर भाष्य केलं आहे.

"आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणलाही इंटरेस्ट नाही," असं पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) म्हटलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवारसाहेब म्हणाले, "आमच्याकडे 'मुख्यमंत्रिपदा'साठी कोणालाही इंटरेस्ट नाही. आम्हाला परिवर्तन हवं आहे. आणि जनतेला पर्याय हवा आहे. त्यासाठीच आम्ही काम करत आहोत."

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील दौऱ्यावर शरद पवारसाहेबांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी 3 तारखेला कागलला जातो आहे. कागलकरांच्या आग्रहास्तव तिकडे सभा घेणार आहे. अनेक जण भेटण्यासाठी येत आहेत," असं शरद पवारसाहेबांनी सांगितलं.

जागावाटपाबाबत बोलताना पवारसाहेबांनी म्हटलं, "तीन पक्ष विधानसभेसाठी एकत्रित आहे. यात डावे पक्ष देखील यावेत, अशी इच्छा आहे. मतदारसंघ कोणते घ्यावेत यावर विचारविनिमय करायला बैठक आयोजित केली होती. पण, आता 27 तारखेला तीनही पक्ष एकत्रित बसतील, लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT