VIDEO : सांगलीत 'MVA'मध्ये वाद उफाळला! 'पायलट'वरून विशाल पाटील अन् ठाकरे गटात पुन्हा जुंपली

Vishal Patil Vs Shivsena Thackeray Party : लोकसभा निवडणुकीत तिकीटवाटपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि विशाल पाटील यांच्यात तू-तू-मैं-मैं सुरू आहे. हा वाद थांबवण्याचं नाव घेत नाही.
vishal patil | uddhav thackeray | vishwajeet kadam
vishal patil | uddhav thackeray | vishwajeet kadamsarkarnama
Published on
Updated on

लोकसभेपासून शिवसेनेत ( ठाकरे गट ) आणि खासदार विशाल पाटील यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. विश्वजित कदम यांना 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा' असं वारंवार सांगून त्यांना बाद करण्याची योजना खासदार पाटील यांनी आखली नाही ना? असा सवाल शिवसेनेचे ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी उपस्थित केला होता.

जिल्हाप्रमुख विभुते यांनी विशाल पाटील यांचं विमान दिल्लीला 'लँड' करणाऱ्या 'पायलट'चा उल्लेख केल्यानं पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. आता जिल्हाप्रमुख विभुते यांना खासदार पाटील ( Vishal Patil ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "काहींना टीव्हीवर येण्याची खूप घाई असते. त्यामुळे कोण काय बोललं, तर दुर्लक्ष करा," असं म्हणत खासदार पाटील यांनी जिल्हाप्रमुख विभुते यांना फटकारलं आहे.

vishal patil | uddhav thackeray | vishwajeet kadam
Assembly Election 2024 : विश्वजित कदमांच्या बालेकिल्ल्यातून महाविकास आघाडी फुंकणार विधानसभेचं रणशिंग

जिल्हाप्रमुख विभुते काय म्हणाले होते?

"ज्या 'पायलट'नी खासदार विशाल पाटील यांचे विमान दिल्लीत लँड केले, 'पायलट'ना त्या म्हणजेच आमदार विश्वजित कदम ( Vishwajeet Kadam ) यांना 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा' असे वारंवार सांगून त्यांना बाद करण्याची योजना खासदार पाटील यांनी आखली नाही ना?" असा सवाल जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी उपस्थित केला.

"अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी म्हणून पाठिंबा दिला. असे असताना महायुतीतील भाजपशी निगडित शिंदेसेनेच्या सुहास बाबर यांना ऑफर देऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांच्या मतांचा हा अनादर नाही काय? याचे उत्तर त्यांनी द्यावे. आमदार विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे वारंवार सांगून त्यांना लक्ष्य करण्याचे काम विशाल पाटील करत आहेत. एकीकडे जयंत पाटील यांना लक्ष्य करून विश्वजित यांच्याविरोधात खेळी करण्याची त्यांची योजना नाही ना?" अशी शंका जिल्हाप्रमुख विभुते यांनी उपस्थित केली.

"विशाल पाटील यांनी आघाडीचे घटक म्हणून भूमिका काय असणार? ते स्पष्ट करावे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही सांगली, मिरजेवर दावा करणार आहोत. जयश्री पाटील यांना काँग्रेसमधून तिकीट मिळणार नाही, असे दिसते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर निवडून आणू," असंही जिल्हाप्रमुख विभुते यांनी म्हटलं होतं.

vishal patil | uddhav thackeray | vishwajeet kadam
Sangali Politics: Video विशाल पाटलांच्या बंडखोरीनं संतापलेल्या ठाकरेंचा सूर झाला मवाळ; सांगलीसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला?

विशाल पाटलांचं प्रत्युत्तर...

जिल्हाप्रमुख विभुते यांनी प्रश्नांची सरबत्ती आणि टीका केल्यानंतर विशाल पाटीलही मैदानात उतरले असून जशास-तसं प्रत्युत्तर दिलं आहे. "जिल्हाप्रमुख विभुते यांना विनंती आहे, आघाडीधर्मात कुणी काय बोलले, याचा नेमका कार्य अर्थ होतो, हे बोलणाऱ्यांना विचारावं. तो अर्थ माहिती झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया द्यावी. काहींना टीव्हीवर येण्याची खूप घाई असते. त्यामुळे कोण काय बोललं असेल, तर दुर्लक्ष करूया," असा टोला विशाल पाटील यांनी जिल्हाप्रमुख विभुते यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com