Sharad Pawar addresses media queries amid speculation over a possible split among NCP Members of Parliament. sarkarnama
पुणे

Sharad Pawar Politics : 'ऑपरेशन टायगर'नंतर 'ऑपरेशन तुतारी'; शरद पवारांचा थेट इशारा, म्हणाले, 'आमचा एकही...'

Sharad Pawar on NCP MP Split Rumours : ऑपरेशन टायगरनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील खासदार फुटणार असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चांमधील हवाच शरद पवार यांनी काढून टाकली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

Roshan More

Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. ठाकरे गटातील या मोठ्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारही फुटणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

या संपूर्ण घडामोडींवर आणि रंगणाऱ्या चर्चांवर अखेर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'आमचा एकही खासदार कुठेही जाणार नाही.', असा विश्वास व्यक्त पवारांनी व्यक्त केला.

शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती येथील 'विद्या प्रतिष्ठान' संस्थेच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये आज त्यांची विश्वस्तांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार हे देखील उपस्थित होते.

या बैठकी नंतर पत्रकारांनी शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीचा दाखला देत, राष्ट्रवादीचे खासदारही सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांबद्दल थेट प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'या सुरू असलेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही. आमचा एकही खासदार किंवा इतर कोणताही लोकप्रतिनिधी पक्ष सोडून जाणार नाही. त्यामुळे याबद्दल कोणीही चिंता करण्याची अजिबात गरज नाही."

ठाकरे गटातील सहा खासदारांच्या पक्षांतरामुळे राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या बदलता समीकरणाच्या केंद्रस्थानी आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आले आहे. त्यामुळे भविष्यात आता या पक्षची आणि पक्षातील नेत्यांची वाटचाल कशी राहणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT