Sharad Pawar | Uddhav Thackeray | Nana Patole  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : तिकीटवाटपाचा 'फॉर्म्युला' काय? जागावाटप कधी पूर्ण होणार? शरद पवारांनी सांगूनच टाकलं

Sharad Pawar On Shinde And Bjp Govt : शरद पवारसाहेब म्हणतात, "महाराष्ट्रात महाविकास आघाडीबद्दल अनुकूल वातावरण आहे. जनता परिवर्तन करण्यास उत्सुक असून सरकार, भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना बाजूला करण्याच्या मनस्थितीत आहे."

Akshay Sabale

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दल बैठका पार पडत आहे. 288 पैकी 120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांत सहमती झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, येत्या 10 दिवसांत जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( शरदचंद्र पवार ) शरद पवारसाहेब यांनी दिली आहे.

यावेळी राष्ट्रवादीत तिकीटवाटपाचा 'फॉर्म्युला' कसा असणार? जागावाटपानंतर महाविकास आघाडीची पुढील रणनीती कशी असेल? यावरही पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) भाष्य केलं आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

शरद पवारसाहेब म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य काहीजण इच्छुकांच्या मुलाखती घेतील. नंतर पक्ष इच्छुकांबाबत निर्णय घेईल."

"तीन पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढत आहे. एखादी जागा तीन पक्षांत कुणी लढवावी, याबद्दल विचारविनिमय सध्या सुरू आहे. जागावाटपाबद्दल निर्णय झाला की, तिथे कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय तो-तो पक्ष घेईल. येत्या 10 दिवसांत जागावाटप संपेल. त्यानंतर जनतेत जाऊन आपली भूमिका सांगण्यास सहकारी पक्ष सुरूवात करतील," असं शरद पवारसाहेबांनी सांगितलं.

"महाराष्ट्रात महाविकास आघाडीबद्दल अनुकूल वातावरण आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक खासदार निवडून आला. तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीच्या 48 पैकी 30 लोक आमचे निवडून आले आहेत. याचा अर्थ जनता परिवर्तन करण्यास उत्सुक असून सरकार, भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना बाजूला करण्याच्या मनस्थितीत आहे," असं शरद पवारसाहेबांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT