Pune Sharad Pawar NCP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे मुक्कामी येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी शहरातील खड्डे बुजून घ्या असे पत्र पुणे पोलिसांनी महापालिकेला दिले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा पुणे दौरा झाला होता. या दौऱ्या दरम्यान पुणे शहरातील खड्ड्यांचा त्यांनाही त्रास झाला. त्याबाबत त्यांच्या कार्यालयाने नाराजीही व्यक्त केली होती. याच मुद्य्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाने पुणे महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Draupadi Murmu) यांना दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात शहरातील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागला. यानंतर राष्ट्रपती भवनाने पुणे पोलिसांना पत्र लिहून खड्ड्यांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींना एक आठवड्यासाठी पुणे मुक्कामाचे निमंत्रण पाठवले आहे.
पत्रात म्हटले आहे की, 'दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत आपण प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल आपले तमाम पुणेकरांच्या वतीने मनापासून आभार.'
तसेच 'पुणेकर नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य यातना भोगत आहेत. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, टेकड्यांची फोडाफोडी याने पुण्याचा श्वास गुदमरतोय, अपघातांच्या भीतीने प्रत्येक पुणेकर जीव मुठीत घेऊन फिरतोय, मुळा - मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा, एका पावसात तुंबणारे रस्ते, दिवसाढवळ्या पुण्यातील रस्त्यांवर होणारे खून - दरोडे अशा अवस्थेत पुणेकर जगत आहेत.' असंही पत्राद्वारे सांगण्यात आलं आहे.
याशिवाय 'गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेले सत्ताधारी जनतेच्या वेदनांकडे लक्ष देण्यास तयार नाही. म्हणूनच, पुणेकरांच्या या वेदना अनुभवण्यासाठी आपण पुण्यात एक आठवडा मुक्कामी यावे ही विनंती.' असं शरद पवार यांच्या पक्षाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.