sharad pawar sarkarnama
पुणे

Video Sharad Pawar : निवृत्ती कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितलं योग्य 'टायमिंग'

Sharad Pawar T20 World Cup 2024 : भारतानं टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. याबद्दल शरद पवारांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपूर्वी आणि फुटीनंतर देखील शरद पवार यांच्या राजकारणातून निवृत्त होण्याबाबत अनेक पातळ्यांवरती चर्चा झाली. त्यामुळे शरद पवार कधी निवृत्त होणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यातच खुद्द शरद पवारांनीच निवृत्त कधी व्हावं याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत टी-20 वर्ल्ड कपवरती आपलं नाव कोरलं आहे. या भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलताना शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, "एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचं वेगळं स्थान होतं. मात्र, अलीकडे भारतीय संघाने आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. जिंकण्यासाठी भारताला दरम्यानच्या काळात मोठी प्रतीक्षा करावी लागली. पण, आता भारतीय संघानं अद्भुत प्रकारचा चमत्कार केला."

"वर्ल्ड कप फायनल मॅचमध्ये सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावी, अशी स्थिती होती. मात्र, गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे टी-20 च्या दुष्काळातून भारताची मुक्तता झाली. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा हा शेवटचा सामना होता. द्रविडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो," असं शरद पवारांनी म्हटलं.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वर्ल्डकप जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, "हे दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत .त्यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, ते वनडे आणि टेस्ट मॅच खेळताना पाहायला मिळतील."

"ही गोष्ट चांगली आहे की एका ठराविक कालावधीनंतर तुमचा फॉर्म टॉपवरती असतो, तेव्हाच निवृत्त होण्यासाठी योग्य वेळ असते. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचेही जागतिक क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. भारताची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली. अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली. आता नव्याने तरुणांना संधी मिळावी. यासाठी त्यांनी टी-20 मधून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. याच प्रकारे भारतानं मुंबईत वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा निवृत्ती घेतली होती. पण, निवृत्तीनंतर देखील ते नवीन खेळाडुंना प्रोत्साहित करत राहिले. त्यामुळे नवीन खेळाडुंना प्रोत्साहित करण्यासाठी विराट आणि रोहितने घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो," असं शरद पवारांनी म्हटलं.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT