Sharad Pawar Shared Old Memories Sarkarnama
पुणे

Sharad Pawar: शरद पवार यांची पत्रकारिता अन् बाळासाहेब ठाकरेंसोबतची 'राजनिती'

Sharad Pawar Shared Old Memories Journalism With Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा एक वृत्तपत्र काढण्याचे ठरवलं.'राजनिती' त्याचे नाव होते. ⁠त्यासाठी आम्ही २० हजार रुपये खर्च केले होते.

Mangesh Mahale

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारिता, राजकारण याबाबत मनमोकळेपणानं संवाद साधला. पत्रकारिता क्षेत्रातील जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि अन्य मित्रांसोबत वर्तमानपत्र काढण्याचा शरद पवार यांनी प्रयत्न केला होता. त्याबाबतचा मजेशीर किस्सा त्यांनी सांगितला.

हल्लीच्या काळात मीडिया जास्त प्रभावी आहे. वृत्तपत्र आणि मीडियाच्या मागे अदृश्य शक्ती आहे, असे आता पत्रकारांशी बोलताना जाणवते, असे सांगत पवारांनी आपले मीडियाशी असलेलं नातं सविस्तरपणे सांगितले. पु्ण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

'सकाळ'मध्ये ट्रेनी पत्रकार हवे अशी जाहिरात आली होती. मी अर्ज केला होता. माझी मुलाखत नानासाहेब पुरळेकर यांनी घेतली होती. मला पत्रकार म्हणुन काम करण्याची संधी मिळाली. माझी बातमीदार म्हणून निवड झाली. बातमी लहान असली तरी ती आपल्या गावाची बातमी छापून येते म्हणून दिली पाहिजे, असे परूळेकर म्हणायचे. भीमा नदीला पूर आला होता. लोकांनी कलिंगडची लागवड केली आणि पीक वाहून गेले. ही बातमी मला अस्वस्थ करायची," अशी आठवण पवार यांनी सांगितली.

आम्ही एक पेपर सुरु केला होता. त्याचे नाव 'नेता' असे होते. त्याचे एक-दोन अंक निघाले. नंतर मी हा धंदा सोडला अन् पक्षाचं काम सुरू केलं, असे पवार म्हणाले.

"बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा एक वृत्तपत्र काढण्याचे ठरवलं त्याचे नाव 'राजनिती' होते.⁠त्यासाठी आम्ही काही मित्रांनी पाच, पाच हजार रुपये जमा केले होते. २० हजार रुपये खर्च केले होते, अशी माहिती त्यांनी सांगितली.

बाळासाहेब ठाकरे आणि व्ही.के. देसाई आणि आणखी एक मित्र होता. 'टाइम्स'च्या अंकासारखा आम्ही 'राजनिती' चा अंक काढला. पहिला अंक ⁠सिद्धी विनायकाच्या चरणी वाहीला. पुन्हा काही तो अंक दिसला नाही, असे ते मिश्किलपणे म्हणाले.

'सामना' वाचता का? यावर ते म्हणाले, "हल्ली'सामना' वाचायला लागलो आहे," असे त्यांनी सांगितल्यावर सभागृहात हास्यांचे फवारे उडाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT