IAS Pooja Khedkar: महापालिकेच्या नोटीशीनंतर खेडकर कुटुंब आले वठणीवर; नेमकं काय घडलं?

Pune Municipal Corporation Issues Notice Pooja Khedkar For Encroachment: महापालिकेकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिटकवली होती. त्यानंतर आता ते अतिक्रमण हटवण्यात आले आहे.
IAS  Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar)यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. आता पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे महापालिकेने (PMC) अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. महापालिकेकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिटकवली होती. त्यानंतर आता ते अतिक्रमण हटवण्यात आले आहे.

पुणे महापालिकेकडून मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवरील करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत ही नोटीस आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवण्याच्या सूचना या नोटीसीमध्ये केली होती.

हे अतिक्रमण ७ दिवसात न हटवल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील त्यात नमूद केले होते. फुटपाथवर साठ फूट लांब तीन फूट रुंद आणि दोन फूट उंचीचे बांधकाम करण्यात आले होते. याबाबत पथविभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली होती. बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही नोटीस चिटकवली होती. त्यानंतर खेडकर कुटूंबाने हे अतिक्रमण आज स्वतःहून हटवले आहे.

पूजा खेडकर यांचा कारनामा

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी केलेल्या 'प्रतापा'मुळे त्या सध्या जोरदार चर्चेत आल्या होत्या. आपल्या खासगी ऑडी कारवर त्यांनी अंबर दिवा लावला होता.

IAS  Pooja Khedkar
Video Hiraman Khoskar: मला त्रास दिल्यास मी गप्प बसणार नाही, 'क्रॉस व्होटिंग'चा आरोप असलेले काँग्रेसचे आमदार संतापले

जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटीचेंबर ताब्यात घेत त्यांचे सामान बाहेर काढले होते. आयएएस अधिकारी असतानाही त्या दर्जाच्या सोयीसुविधा मिळत नसल्याने खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना कडक शब्दात समज देखील दिली होती. त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली होती.त्यानंतर त्या बाबतचा अहवाल दिवसे यांनी शासनाला पाठवला होता. नंतर खेडकर यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com