Sharad Pawar Latest Marathi News Maharashtra State Wrestling Council Updates
Sharad Pawar Latest Marathi News Maharashtra State Wrestling Council Updates sarkarnama
पुणे

शरद पवारांनी आरोप फेटाळला ; म्हणाले, 'याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नाही'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Wrestling Council) बरखास्त करण्यात आली असल्याची चर्चा आहे. या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. (Maharashtra State Wrestling Council news Updates)

पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद रद्द करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लांडगे यांच्याविरोधात अनेक तक्रारी

शरद पवार म्हणाले, "मी अनेक वर्षापासून विविध खेळांच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. खेळाडुंच्या निवडीत मी लक्ष घालत नाही, त्या त्या खेळातील जाणकार व्यक्ती त्यात लक्ष देतात. मी त्यांना काही अडचणी आल्या तर मी त्यांना मदत करीत असतो. शासकीय मदत हवी असल्यास त्यांना मदत करतो. कुस्तीगीर परिषदेतही मी हे काम करीत आहे. कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी भारतीय कुस्तीगीर संघटनेकडे आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद रद्द केली ," पवार टीव्ही ९ या वृ्त्तवाहिनीशी बोलत होते.

दिल्लीत संघटनेच्या अध्यक्षांना भेटणार

"पुण्यातील परिषदेच्या संघाकडून लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. मी त्यांना याबाबत समजून सांगितले, सुधारणा करण्यास सांगितले होते. पुण्यातील हिंदकेसरी काका पवार यांचीही तक्रार आली होती, या तक्रारी भारतीय कुस्तीगीर संघटनेकडे गेल्या होत्या. ते कडक कारवाई करतील, असे वाटलं होते. ही झालेली कारवाई चांगली नाही. दिल्लीतील संघटनेच्या अध्यक्षांना भेटून दुरुस्त्या केल्या जातील, भारतीय कुस्तीगीर संघटना मदत करेल,"असा विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला.

खेळांच्या संघटनेत राजकारण आणत नाही

"खेळांच्या संघटनेत मी कधीही राजकारण आणत नाही, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली याचा महाराष्ट्रातील राजकारणाशी संबंध नाही," असे शरद पवारांनी स्पष्ट केलं.

पुणे जिल्हा कुस्ती परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे (Sandeep Bhondwe) व हिंदकेसरी योगेश दोडके यांनी या प्रकारावर भाष्य केलं आहे. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळेच ही कुस्तीगीर परिषद रद्द झाल्याचा आरोप या दोघांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT