शरद पवारांनाही लांडगे जुमानत नव्हते, म्हणून कुस्तीगीर परिषद बरखास्त ; भोंडवेंचा आरोप

लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन करण्यात आले होते.
Sharad Pawar, Maharashtra State Wrestling Council
Sharad Pawar, Maharashtra State Wrestling CouncilSarakarnama

पुणे : भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Wrestling Council) रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) होते ही परिषद बरखास्त करण्यात आल्याने पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra State Wrestling Council)

दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होईल, अशी माहिती मिळत आहे. जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून (wrestler) आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे जिल्हा कुस्ती परिषदेचे अध्यक्ष संदीप भोंडवे (Sandeep Bhondwe) व हिंदकेसरी योगेश दोडके यांनी या प्रकारावर भाष्य केलं आहे. कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळेच ही कुस्तीगीर परिषद रद्द झाल्याचा आरोप या दोघांनी केला आहे.

Sharad Pawar, Maharashtra State Wrestling Council
मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला संधी ? ; अधिवेशनापूर्वी फेरबदल, मंत्रीपद मिळणार

कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांचे आदेश सुध्दा बाळासाहेब लांडगे मानत नव्हते, असा आरोप भोंडवे व दोडके यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी लांडगे यांच्या मुलावर देखील आरोप केले आहेत.

बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन करण्यात आले होते. भारतीय कुस्ती महासंघाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. या बरखास्तीनंतर नव्याने निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com