NCP Pune Sharad Pawar Retirement News  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar निर्णय मागे घ्या, पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे झळकले बॅनर ; राजीनामा सत्र..

NCP Pune : राज्यात राजीनामा सत्र सुरु आहे.

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar Retirement News : राज्याच्या राजकारण काल (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी घटना घडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.त्यावर राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शरद पवार अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी राज्यात राजीनामा सत्र सुरु आहे. पवारांनी त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बॅनर लावले आहेत.

पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. शरद पवार यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली आहे.

या निर्णयावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. पवारांनी पायउतार होण्याचा निर्णय अचानक निर्णय घेतल्यानंतर यावर विचार करुन यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने समिती स्थापन केली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टि्वट करीत प्रतिक्रिया दिली आहे. माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत , असं ट्वीट राणे यांनी केलं.

मनसे आमदार राजू पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे .शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर राजकीय घडोमोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी फेरविचार करावा, असा सल्ला दिला आहे.अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळला असेल, अशी सावध प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले...

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली, तेव्हापासून 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 19960 पासून सुरु झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्षे अविरत सुरु आहे. यातील 56 वर्षे मी कुठल्या सभागृहात सदस्य म्हणून काम केलं आहे. राज्यसभेची पुढची तीन वर्षे राहिली आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या अधिकाधिक प्रश्नांवर लक्ष घालण्यावर माझा भर असेल.

  • आपल्याला माहिती आहे, माझा अनेक संस्थांशी कामकाजामध्ये सहभाग आहे. रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, मराठा मंदीर मुंबई, महात्मा गांधी सर्वोदय संघ, अशा अनेक संस्थांच्या कामकाजामध्ये माझा सहभाग आहे, या कार्यांवर मी अधिक भर देणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT